🌟राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थ्यांचा सत्कार....!


🌟भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ वा वर्धापन दिन उत्साहात🌟


परभणी (दि.१५ ऑगस्ट २०२३) : गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यसैनिक, राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी आणि राज्य आपत्ती कृती बचाव पथकातील जवानांचा सत्कार करण्यात आला.भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हा सत्कार समारंभ सोहळा पार पडला.   


 
यावेळी खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर- साकोरे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.


शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी पार्थ पंकज बिरादार, शरयु कैलास जाधव, कान्होप्रिया अभयसिंग नाईक, पृथ्वीराज भुजंग गमे, प्रणव प्रकाश शिंदे, मानसी राजेश मंत्री यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथे शेतातील कुपनलिकेत २० फूट खोल पडलेल्या ५ वर्षीय बालकास बचाव मोहिमेत राज्य आपत्ती बचाव पथकाने यशस्वीरित्या बाहेर काढल्याबद्दल पोलीस निरीक्षक मनोज परिहार, पोलीस उपनिरीक्षक शंकर ऊकांडे, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी (नांदेड) किशोर कुऱ्हे, पवन खांडके (परभणी), पोलीस हवालदार गजानन मानकर, पोलीस शिपाई अनिल वाघ, विलास कोळी यांनाही प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजनामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय व पांडुरंग सुपर स्पेशालिटी रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या