🌟मंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील महिलांचा अवैध व्यवसायाविरोधात एल्गार....!


🌟गावातील अवैध दारु विक्रीसह सर्वच अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी🌟

फुलचंद भगत

वाशिम (दि.२२ आगस्ट २०२३) : मंगरूळपीर तालुक्यातील दाभा येथील अवैद्य गावठी, देशी दारू विक्री,जुगार व अवैध रेशनचे धान्य  घेणारावर कारवाई करून हे व्यवसाय बंद करावेत अशी मागणी ता २२ रोजी दाभा येथील सरपंच, उपसरपंच, महीला व ग्रामस्थांनी ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


निवेदनात नमूद आहे की,आमचे गावात राजरोसपणे गावठी दारू, देशी दारू विक्री व उत्पादन हातभट्टया जोरात सुरू आहे. जुगार सुध्दा उघडपणे दहा जागेवर सुरू असतो.अवैध देशी दारू गावात विक्री होते. या सर्व गंभीर प्रकारामुळे गावातील तरूण व्यसनी होत आहे. अनेक संसार उघडयावर येत आहेत. शासनाने दिलेला राशनचा माल गहु, तांदुळ दारूसाठी गावातच विकला जातो. त्यामुळे गरीबांचे जगणे असहाय्य झाले आहे. या सर्व बाबीमुळे गावाची एकता धोक्यात आली आहे. व्यसनी लोक रात्रदिवस रहदारी रस्त्यावर उधम करीत बेताल वर्तन करतात. विद्यार्थी ये जा करतांना त्यांना त्रास होत आहे. कृपया या सर्व बाबींचा विचार करून बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली.निवेदनावर सरपंच,उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य,महीला व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या