🌟जळगाव एसीबीने १५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना चोपडा पोलिस स्थानकातील लाचखोर स.फौजदार घेतला ताब्यात....!


🌟गांजाची केस न करण्यासह दुचाकी सोडविण्यासाठी मागितली होती लाचखोर सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्करने लाच🌟


जळगाव (दि.२५ आगस्ट २०२३) - जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस स्थानकात कार्यरत सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्कर याने गांजाची केस दाखल न करण्यासाठी तसेच जप्त केलेले दुचाकी वाहन सोडण्यासाठी तक्रारदारास २० हजारांची लाच मागून तडजोडीअंती लाचेपोटी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यास जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या पथकाने लाच स्विकारताच रंगेहात ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली चोपडा शहरातील बसस्थसानक परीसरात आज शुक्रवार दि.२५ आगस्ट २०२३ रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

या घटने संदर्भात अधिक माहिती अशी की शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील ३२ वर्षीय तक्रारदार यांचे चुलत भाऊ व त्याच्या मित्रांना २३ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ०९-०० वाजता तीन पोलिसांनी सत्रासेन रस्त्यावर दुचाकीवरून पकडले होते. पोलिस स्थानकात चला, तुमच्यावर गांजाची कारवाई करायची आहे, अशी दमदाटी करून त्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत आरोपी पोलिसांनी तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून पहाटेच्या सुमारास ३० हजार रुपये उकळले व तरुणांची दुचाकी ठेवून घेतली तसेच दुचाकी सोडवायची असेल तर २० हजार रुपये लागतील अशी मागणी दि.२४ आगस्ट २०२३ रोजी संशयित सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्करने केली व १५ हजार रुपये देण्यावर तडजोड करण्यात आली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी आज शुक्रवार दि.२५ आगस्ट रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे १५ हजारांची लाच रक्कम आणल्यानंतर चोपडा शहरातील बसस्थानचोपडा शहरातील बसस्थानकाजवळ संशयित चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्कर आल्यानंतर त्यास लाच दिली व पथकाला लाच दिल्याचा इशारा करताच पथकाने संशयितावर झडप घालून त्यास अटक केली. संशयिताविरोधात चोपडा शहर पोलिसात लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, बाळु मराठे, राकेश दुसाणे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या