🌟परभणी तालुक्यातील खानापूर येथील प्रगतशील अल्पभुधारक शेतकऱ्याचा कौतुकास्पद उपक्रम....!


[काशिफळ भोपळा शेतातून तोडून खाद्यावर आणून एकत्र करतांना स्वतः पंडीत थोरात]

🌟शेतीमध्ये सातत्याने कष्ट करून राजगिरा,काशीफळ,ओवा,तुर,कदु,सर्व भाजीपाला अदीचे केले विक्रमी उत्पादन🌟


परभणी : परभणी तालुक्यातील खानापूर येथील प्रगतसिल उपक्रमसिल अल्पभूधारक शेतकरी पंडीत नथुराम थोरात पत्नी अर्चना , दोन मुली ,एक मुलगा,आई प्रयागबाई हे कुटुंब आहे लेकर शिक्षण घेत आहेत . शेतीमध्ये सातत्याने कष्ट करून राजगिरा,काशीफळ,ओवा , तुर , कदु ,सर्व भाजीपाला अदीचे विक्रमी उत्पादन घेत समाजापुढे सुखी कुटुंबाचा आदर्श ठेवत आहेत.

2016 ते 17 दरम्यान वीस गुंठे काशीफळ भोपळा हा महेको.पमकीन. एन .वन याची लागवड 25 एप्रिल रोजी केली होती याला फक्त सुरुवात त शेवट पाच हजार रुपये खर्च झाला होता त्यामधून मला निव्वळ उत्पादन दीड लाख रुपये मिळाले होते .मी पन्नास रुपये किलोतून हात विक्री करून याच फळाचे दीड लाख रुपये मी  तयार केले होते नंतर 2017 ते 2018 या कार्यकाळात मी विसगुंठे काशीफळ भोपळा लागवड केली तो पण चाळीस रुपये किलोंना विक्री करून एक लाख वीस हजार रुपयांच्या आसपास   मी त्याचे पैसे तयार केलेले आहेत नंतर 2018 ते 2019 या कार्यकाळामध्ये 35 गुंठे काशीफळ भोपळा लागवड केली. यावर्षी पावसाचा जास्त प्रादुर्भाव व पिकावरती व्हायरस आल्यामुळे त्यामधून मला 60 ते 70 हजार रुपये माझ्या वाट्याला हाती हात विक्री करून  आले पावसाचं प्रमाण जास्त  व वेलवर्गीय पिकावर व्हायरस आल्यामुळे यावर्षी नशिबाने साथ दिली नाही त्यावर्षी हात विक्रीतून 60 ते 70 हजार रुपये माझे झाले नंतर तीन वर्ष नशिबाने साथ सोडली माझ्या आईला सुरुवातीला अर्धांग वायू व नंतर कॅन्सरग्रस्त आजार झाल्यामुळे मी तीन वर्षे शेतीकडे लक्ष देऊ शकलो नाही त्यामुळेच मला हे पीक घेता आले नाही यावर्षीच म्हणजे 2023 मध्ये मी पंधरा गुंठे याची लागवड करून जवळपास 25 ते 30 क्विंटल  तयार केलेला आहे अजून काही शेतामध्ये बाकी आहे आता यावर्षीच्या उत्पन्नाचा बजेट सर्व विक्री झाल्याच्या नंतर लावावे लागेल कमी खर्चामध्ये हा भोपळा चांगला उत्पादन देतो फक्त याचं मार्केटचं व्यवस्थापन व याला स्वतः    भाजीपाल्यासोबत मी जसं हात विक्री करतो त्याचप्रमाणे सर्वांनी हात विक्री जर केलं तर हे किमान 40 रुपये किलो तरी हात विक्री विकू शकते व याची खूप पैसे फक्त हात विक्रीतून होऊ शकतात याला मार्केटला जास्त किंमत नसते असा माझा वैयक्तिक अनुभव सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती जर तुम्हाला हे पीक घ्यायचं असेल तर सुरुवातीला मार्केटचा अभ्यास करूनच घ्यावा नंतर याला हात विक्री जर करता आलं तरच घ्यावा अन्यथा घेऊ नये का तर याला मार्केट फार दूर दूर आहे व काही भागांमध्ये हे जास्त विक्री होत नाही त्यामुळे मार्केटचा  अभ्यास करून व स्वतः विक्री करूनच याचे पैसे होऊ शकतात हे पण गांभीर्याने विचार करूनच लागवड करावी हाच महत्त्वाचा सल्ला

        नियमितपणे पंडीत थोरात   काशिफळ  पिकाविषयी खूप महत्त्वाचा सल्ला कृषी विभाग येथील एचडीओ रवी हरणे , कृषी माहिती तंत्रज्ञान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील डॉ .गगाजान गडदे,  कृषी विज्ञान केंद्र येथील अमित तुपे  यांचा खूप महत्त्वाचा सल्ला असतो. याला जास्त जास्त एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च खूप होतो . किमान एका फळाचं वजन पाच किलो पासून  ते 15 किलो पर्यंत  दरवर्षी उत्पादन काढत आहे.राजगिरा काशीफळ, मिरची , व इतर भाजीपाल या उत्पादनातुन माझे कुटुंब समाधानी आहे .

- डॉ. गजानन गडदे 

विस्तार कृषी विद्यावेतन तथा व्यवस्थापक व .ना . कृषी विद्यापीठ परभणी 

          सर्वात महत्त्वाचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान तज्ञ डावखरे सर यांचा लाभला 

श्री पंडित थोरात हे नेहमीच विविध पिके घेण्यात अग्रेसर असतात तसेच, विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरून पीक लागवड करणे तसेच लागवड तसेच  उत्पादन खर्च कमीत कमी करणे यावर त्यांचा भर असतो त्याकरिता ते कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या संपर्कात राहून याविषयी वेळोवेळी माहिती घेतात आणि आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करून उत्पादित केलेला माल स्वतः हात विक्री करून ते अधिक नफा मिळवितात. त्यामुळे इतरही शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण करून आपल्या शेतीमध्ये मागणी  आधारित विविध पिकांचे उत्पादन घेऊन उत्पन्नात वाढ करण्याकडे भर द्यावा.

- डॉ. गजानन गडदे 

विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा

रामेश्वर साबळे 

प्रगतसिल शेतकरी परभणी.

            भाजीपाला उत्पादक ग्रुप आणि फार्मर, ऑफिसर ग्रुप , कृषी मित्र पूर्णा तयार करून कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली पंडितराव थोरात यांनी पाच वर्षांमध्ये राजगिरा काशी भोपळा व भाजीपाला असे उत्पादने घेऊन स्वतः विद्यापीठ गेट काळीकमान येथे  हात विक्री करून मार्केटमध्ये दहा रुपये किलोचे फळ 40 रुपयांनी विकले म्हणूनच त्यांना चार पैसे जास्त मिळाले  त्यांची  प्रगती चांगल्या झाली म्हणून  इतर शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतातील माल.स्वतःच विकला पाहिजे. तरच. आपण प्रगती करू शकतो

* प्रा. अमित तुपे 

शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र परभणी 

परभणी शहरातील स्वच्छ, सात्विक, रसायनमुक्त आणि वाजवी दरात फळे व भाजीपाला थेट शेतकऱ्याच्या शेतातुन ग्राहकाच्या हातात पोहचविण्याच्या चळवळीचे प्रमुख म्हणुन श्री. पंडितराव थोरात यांची पुर्ण परभणी शहराला ओळख आहे.स्वत: शेतात राबुन अत्यंत कमी जमिन असुनही एकात्मिक पद्धतीच्या शेतीचा अवलंब त्यांनी आपल्या शेतात केला आहे.

एकात्मिक लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करुन त्यांनी शेतीचा उत्पादनखर्च तर कमी केलाच आहे परंतु आपण उत्पादित केलेला माल आपणच प्रक्रिया करुन विकणे आणि स्वत:च्या उत्पादनाचे मार्केट स्वत:च तयार करणे हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्या कायम संपर्कात राहुन पंडितराव नवनवीन माहिती घेतात आणि त्याचा अवलंबही ते आपल्या शेतात करतात हे सर्व शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायक आहे.

- प्रा. अमित तुपे

शास्त्रज्ञ,

कृषि विज्ञान केंद्र, परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या