🌟कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला अध्यक्ष प्रजावतीताई कांबळे ह्या होत्या🌟
परळी :- भारतीय बौद्ध महासभा परळी तालुका संपर्क कार्यालयाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी कीदिनांक 24 ऑगस्ट 2023, गुरुवार रोजी मिलिंद नगर, परळी वै. जिल्हा बीड (पूर्व) या ठिकाणी आद. हनुमंत वाघमारे सर, तालुका अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, परळी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय जेके कांबळे सर वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रसंजीत रोडे तालुकाध्यक्ष गौतम साळवे डॉक्टर स्वप्निल महाळंगीकर युवक तालुका अध्यक्ष राजेश सरवदे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफारश्या वंचित बहुजन आघाडीचे युवक शहराध्यक्ष प्रेम जगतकर इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशपाल बचाटे साहेब यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला अध्यक्ष प्रजावतीताई कांबळे ह्या होत्या तर उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष एचडी वाघमारे सर हे होते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून यावेळीअनेक मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी व बौद्ध उपासक ,उपसिका, बालक ,बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते....
0 टिप्पण्या