🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या....!


🌟एकनाथ शिंदे व त्यांचे आमदार हे भाजपमध्ये जातील हा निर्णय आधीच झालेला आहे - आ.एकनाथ खडसे

✍️ मोहन चौकेकर                                                       

* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बोलताना 2024 मध्ये पुन्हा आपणच पंतप्रधान होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 

* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बोलताना विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने लोकांसाठी विश्‍वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली. विश्वकर्मा योजनेत 15 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

* देशात आतापर्यंत 10 हजार जन औषधी केंद्र होती. आता हे लक्ष्य 25 हजार औषधी केंद्राच केलं आहे. म्हणजे अजून 15 हजार जन औषधी केंद्र सुरु होतील. ही पंतप्रधान नरेंद्र मोदीची गॅरेंटी आहे, पुढच्या पाच वर्षात भारताचा पहिल्या टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होईल.

* शहरात जे लोक भाड्याच्या घरात राहतात. ज्यांच्याकडे स्वत:च घर नाही. जे अनधिकृत कॉलनीमध्ये राहतात. घर घेण्यासाठी बँकांकडून लोन मिळतं. त्यांना व्याजात सवलत दिली जाईल. त्यासाठी लवकरच घोषणा केली जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी बोलताना सांगितले.

* गावागावात दोन कोटी लखपती दीदी बनवण्याचे माझे स्वप्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी बोलताना सांगितले* *माझ लक्ष्य गावांमध्ये 2 कोटी लखपती दीदी बनवायच आहे. एग्रीकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आम्ही वुमेन सेल्फ हेल्प ग्रुपची ट्रेनिंग देऊ. यात महिलांना ड्रोन चालवण्याच प्रशिक्षण देण्यात येईल. आम्हाला गावात महिलांना मजबूत करायच आहे.

* देशाने एक हजार वर्षाची गुलामी पाहिली आहे. 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. पुन्हा एकदा देशाला संधी मिळाली आहे. आता आपण जे करु, त्याचा परिणाम पुढच्या 1000 वर्षात दिसून येईल. भारत माता पुन्हा एकदा जागृत झाली आहे. हा कालखंड देशाला पुढे घेऊन जाईल.

* मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा : नेहमी मेरे प्यारे देशवासीयों…असं म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात करण्याऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाची सुरुवात मेरे प्यारे परिवारजण असं म्हणत केली. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरलं. मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडावी, अशी वारंवार मागणी केली. त्यानंतर आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर भाष्य केलं.

* मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. अनेकांनी आपल जीवन गमावलं. पण आता हळूहळू शांतता निर्माण होत आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. शांततेनेच यावर तोडगा निघेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

* पुढील एक हजार वर्षांवर भाष्य : मी 1000 वर्षांपूर्वी गोष्ट यासाठी बोलतोय कारण पुन्हा एकदा संधी आली आहे. हे अमृतकाळाच पहिल वर्ष आहे. या कालखंडात आपण जी पावलं उचलू, जे निर्णय घेऊ त्याचा पुढच्या 1000 वर्षावर प्रभाव पडेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

* भारत युवांचा देश : आज जगात 30 वर्षापेक्षा कमी वयाची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे.याच्या बळावर आपण बरच काही साध्य करु शकतो. आता आपल्याला थांबायच नाहीय, दुविधेमध्ये जगायच नाहीय, गमावलेली समृद्धी परत मिळवायची आहे. आपण जे काही निर्णय घेऊ, ते पुढच्या 1000 वर्षाची दीशा निर्धारित करतील. आपल्याकडे लोकशाही आणि विविधता आहे. जगातील देश वयोवृद्ध होत चालले आहेत. पण भारत युवा होतोय. आज घेतलेल्या निर्णयाने भविष्य निश्चित होईल. सामर्थ्य देशाचं भाग्य बदलेल. आता थांबायचं नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

* निर्यात वाढतेय : भारतातून निर्यात वेगाने वाढतेय. तज्ज्ञ याकडे पाहत आहेत. त्यांना माहित आहे की, भारत आता थांबणार नाही. कोरोना काळानंतर एक नवीन वर्ल्ड ऑर्डर आकाराला येत आहे. बदलणाऱ्या विश्वाला आकार देण्यात तुमच सामर्थ्य दिसून येत आहे. कोरोना काळात भारत ज्या प्रकारे पुढे गेला, ते जगाने पाहिलं, असंही पंतप्रधान पंतप्रधान मोदी म्हणाले.

* जी-20 शिखर परिषदेच्या यजमान पदावर भाष्य

* आज देशाला जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली. जी-20 च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामुळे भारतीयांची क्षमता जगासमोर आली, असं पंतप्रधान  नरेंद्र मोदी म्हणाले.

* मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण

* शरद पवारांना केंद्रात कृषीमंत्री आणि निती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

* मी त्या गाडीत नव्हतोच, पवारांसोबतच्या गुप्तभेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण

* शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी -- नाना पटोले 

* नवाब मलिक तुरुंगातून बाहेर येताच अजित पवार गटाचे नेते भेटीला

* एकनाथ शिंदे व त्यांचे आमदार हे भाजपमध्ये जातील हा निर्णय आधीच झालेला आहे - आ.एकनाथ खडसे

* शरद पवार यांच्या संदिग्न भुमीकेमुळे शिवसेना व कॉग्रेसचा एकत्र लढण्याचा निर्णय ; उद्धव ठाकरे व नाना पटोले आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या बैठकीत ठरला बी प्लॅन

* मी कोणालाही लपुन भेटत नाही मी सर्वांना उघडपणेच भेटतो -- अजित पवार*

* स्वातंत्र्यदिनी इस्लामपूरच्या राजश्री जाधव-पाटील यांनी सर केले युरोप खंडातील सर्वोच्च शिखर

* 'जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत सन्मानाने हा तिरंगा फडकत राहील' --- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात शासकीय ध्वजारोहण संपन्न

* विरोधकांच्या कॉग्रेसच्या  काळात  'गरीबी हटाव' घोषणा झाल्या, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनींच गरीबी हटवण्याचा प्रयत्न केला'  -- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

* मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात शासकीय ध्वजारोहण संपन्न*

* नाशिक जिल्ह्याचे शासकीय ध्वजारोहण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न

* आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत अमरावती जिल्हा बँकेत शहीद वीर यांच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

* कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्य ध्वजारोहण

* मुख्यमंत्री बदलण्याच्या विरोधकांच्या पुड्या गल्लीमधल्या आहेत - पणनमंत्री अब्दुल सत्तार*

* 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आ. बच्चू कडू यांची अमरावतीत तिरंगा सायकल रॅली.*

* नाना पटोले यांच्या हस्ते मुंबई येथील टिळक भवन येथे ध्वजारोहण संपन्न.

* नागपुरात दृष्टीहीन चिमुकलीने तलावात तब्बल अडीच किमी पोहून केले ध्वजारोहण*

* राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी बुलढाणात केले ध्वजारोहण

* संभाजीनगर/  औरंगाबादमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न; या वेळी चंद्रकांत खैरे व संदीपान भुमरे यांच्यामध्ये   वाद होऊन रंगले मानअपमान नाट्य ; चंद्रकांत खैरे रागारागाने कार्यक्रम सोडून गेले. 

* मुख्यमंत्री बिमार आहे की नाही माहीत नाही, पण राज्य पुर्णपणे बिमार आहेत - आमदार रोहित पवार

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या