🍪पुर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी धोंडे जेवणाची मेजवानी.....!


🔶यावेळी जिरा राईस,दाल फ्राय,पुरणाचे धोंडे,जिलेबी,मसाला पापड अशा प्रकारे जेवणाचा सुंदर मेनू तयार करण्यात आला🔶


पुर्णा (दि.०५ ऑगस्ट २०२३) - पुर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील जिल्हा परिषद डिजिटल व सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आज शनिवार दि.०५ ऑगस्ट २०२३ रोजी धोंड्याच्या महिन्याच्या पार्श्वभूमीवर धोंडे जेवणाची मेजवानी देण्यात आली.


यावेळी जिरा राईस,दाल फ्राय,पुरणाचे धोंडे,जिलेबी,मसाला पापड अशा प्रकारे जेवणाचा सुंदर मेनू तयार करण्यात आला होता.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व कर्मचारी व उपस्थितांनी या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला सर्वांना समतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक आगळीवेगळी वेगळी पर्वणीच ठरला.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या