💥जेठ रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी दमरेचे विभागीय व्यवस्थापक यांचे मार्फत दिले रेल्वे मंत्र्यांना निवेदन💥
पुर्णा (दि.०७ आगस्ट २०२३) : पुर्णा येथे काल रविवार दि.०६ आगस्ट रोजी अमृत भारत स्टेशन योजनेच्या पायाभरणी कार्यक्रमात जेष्ठ रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक यांचे मार्फत रेल्वे मंत्र्यांना पूर्णेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीचे निवेदन दिले.
जेष्ठ रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने या मागण्या केल्या आहेत पूर्णा शहरातील सिध्दार्थ नगर,डॉ.आंबेडकरनगर व शहरातील मार्केट परिसराला जोडणारा हिंगोली प्रमाणे पादचारी पूल बांधण्यात यावा,औरंगाबाद,नांदेड आदि रेल्वे स्टेशन वर असलेल्या,विश्रामगृह,भोजनालय, नागरीकांना सुविधा प्राप्त अशी रेल्वेची सेवा देणारी सर्व कार्यालये,बांधण्यात यावीत,नांदेड मार्गे मर्सुल हा बायपास नवीन मार्ग रद्द करण्यात यावा,पुर्णा येथे मुबलक पाणीपुरवठा करणारा साठा आणि रेल्वेची भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्याने येथे रेल्वेचे डब्बे सफाई व दुरुस्ती करणारा कर्मचारी स्टाफ नियुक्त करण्यात यावा,कार्यरत व सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने रेल्वे दवाखान्यात विशिष्ट डॉक्टरांसह भरपूर स्टाफ आणि अद्यावत यंत्रसामुग्री देण्यात यावी,याशिवाय तिकीट तपासनीस कार्यालय,रेल्वे पोलीस निरीक्षक आणि आवश्यक स्टाफ आणि कार्यालय,तथा रेल्वे सुरक्षा बल यांच्या संख्येत वाढ करण्यात यावी,राजकीय भूमिका आणि नेतृत्वाच्या अभावामुळे अधोगतीला जाणारे पूर्नेचे वैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी इथे इलेक्ट्रिक शेड आणि त्याचेशी सलग्न कर्मचारीवृंध यांची नियुक्ती करण्यात यावी.अशा मागण्याचे निवेदन रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी दिले असून त्यांनी केलेल्या अत्यावश्यक व न्यायीक मागण्यांवर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनासह रेल्वे मंत्रालय काय निर्णय घेते याकडे पुर्णेकरांचे लक्ष लागले आहे.......
0 टिप्पण्या