🌟अपवार महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती निमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते🌟
पुर्णा (दि.१२ आगस्ट २०२३) - ग्रंथालये ही मानवी संस्कृती व ज्ञान जतन करण्याचे कार्य करतात असे प्रतिपादन येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील ग्रंथालयशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.अशोक कोलंबीकर यांनी केले. ते महाविद्यालयातील डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की भारताला फार मोठी संस्कृती लाभलेली असून तो सांस्कृतिक वारसा ग्रंथाच्या रुपाने जतन झाला पाहिजे काळानुसार मानव हा आधुनिकीकरणाकडे वळत आहे. नवनवीन तंत्रज्ञान ,आय टी क्षेत्र ,मीडिया या विविध माध्यमांचा वापर आज मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी होतो आहे. अशा काळातही भारताची थोर संस्कृती विद्यार्थ्यांना समजावी म्हणून ग्रंथालय व माहिती शास्त्र महत्वाचे योगदान देत आहे.
ग्रंथालयातील विश्वकोश,ज्ञानकोश चरित्रकोश,चरित्रे,कथा कादंबऱ्या, कविता वाचन करण्याची प्रेरणा देत असतात म्हणून विद्यार्थ्यांनी ग्रंथ हाच गुरू आणि मित्र समजून वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रंथालयातील ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले होते या ग्रंथ प्रदर्शनास सर्व विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहभाग घेतला याप्रसंगी प्रा.विनोद मुनेश्वर प्रा.दत्ता पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रंथपाल डॉ. विलास काळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए.तृतीय वर्षाच्या गीता कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन पूनम दारकोंडे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या