🌟जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मुदखेड रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाचा नवा अध्याय आज रचण्यात आला🌟
नांदेड (दि.०६ आगस्ट २०२३) - देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज "अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत, देशातील ५०८ रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली. या ५०८ पैकी आपल्या नांदेड जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे जंक्शन असलेल्या मुदखेड रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाचा नवा अध्याय आज रचण्यात आला असून आज रविवार दि.०६ आगस्ट २०२३ रोजी मुदखेड रेल्वे स्थानकावर पुनर्विकास कोनशिलेचा अनावरण सोहळा पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांच्या शुभहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला.
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.श्री.रमेशसिंह बैस साहेब, मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, केंद्रीय रेल्वेमंत्री मा.श्री.आश्वीनी वैष्णव साहेब, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.गिरीशभाऊ महाजन, यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवली तर कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्ह्याचे खासदार मा.श्री.प्रतापराव पाटील चिखलीकरजी, विधानपरिषद सदस्य आ.राम पाटील रातोळीकरजी, भाजपा प्रदेश सचिव देविदास भाऊ राठोड, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, महेश बाळू खोमणे, बालाजीराव बच्चेवार, धर्मराज देशमुख, किशोर देशमुख, श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मण ठक्करवाड, माजी नगरसेवक राजू गोरे, दीपक सिंग रावत, मुदखेड भाजपा तालुका अध्यक्ष एस टी एम, मोतीराम पाटील ब्राह्मणवाडेकर, प्रभू पाटील इंगळे, प्रविणभाऊ गायकवाड, शंकरराव मनाळकर, सुशील चव्हाण, सुधाकरराव देशमुख, डॉ अमोल ढगे, माधआण्णा साठे, विनय सगर, सुधाकर कदम, डॉ लक्ष्मण इंगोले, डीगाबंर टिपरसे, सुरेश लोट, यांच्यासह नांदेड रेल्वे विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.......
0 टिप्पण्या