🌟पुर्णेत मानव मुक्ती मिशन प्रेरित मजलीस-ए-इन्सानियतची बैठक संपन्न....!


🌟या बैठकीत मानव मुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांनी मार्गदर्शन केले🌟 

परभणी/पुर्णा (दि.२१ आगस्ट २०२३) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथे आज सोमवार दि.२१ आगस्ट रोजी मानव मुक्ती मिशन प्रेरित मजलीस-ए-इन्सानियतची बैठक संपन्न झाली.

  या बैठकीत मानव मुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांनी मार्गदर्शन केले आणि काही मान्यवरांच्या हस्ते मजलीस ए इन्सानियतच्या नियुक्त्या करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी सलीम शहा यांची निवड करण्यात आली.मासूम अली शहा बशीर अली शाह यांना उदगीर तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती पत्रक देण्यात आले तर सय्यद मुनीर सय्यद शबीर यांना पूर्णा ता. उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली तसेच परभणी महानगर उपध्यक्ष या पदावर जब्बार वली शहा यांची निवड करण्यात आली. सुफी परंपरेचे प्रचारक असणाऱ्या या फकीरांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन घेण्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली.

              या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्त परायण एकनाथ महाराज भालेराव , लिंगायत धर्माचे अभ्यासक शरण नितीन दावलबाजे,शरण बाबुराव अप्पा पटवे, कॉम्रेड नसीर शेख,  प्रबुद्ध कांबळे,विलास खाडे,एजाज शहा मगदूम शहा, नजीम जुम्माशहा, शिराज शाह रियाजोद्दीन शहा, मगबुल शहा छोटू शहा, मुनीर शब्बीर शहा आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या