🌟पंतप्रधानांच्या हस्ते उद्या भूमीपूजन : आमदार मेघना बोर्डीकर यांच्याद्वारे आभार व्यक्त🌟
परभणी (दि.०५ आगस्ट २०२३) : अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी,पुर्णा,सेलू,गंगाखेड या चार रेल्वेस्थानकांचा कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून पुनर्विकास होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे अशा स्थितीमध्ये आपल्या मराठवाड्याला भरघोस असा निधी उपलब्ध होत आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान मोदी यांनी ‘अमृत भारत स्टेशन’ योजने अंतर्गत देशातल्या 508 स्टेशनच्या पुनर्विकासासाठी बजेट जाहीर केले. त्यामध्ये आपल्या परभणी जिल्ह्याचे चार रेल्वे स्थानक आहेत व त्यांचे उद्घाटन रविवारी (दि.6) सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. परभणी जिल्ह्यातील 4 रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी सेलू -23.2 कोटी, परभणी-25.9 कोटी, पूर्णा-23.7 कोटी, गंगाखेड-24.0 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत या चार रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे.
अमृत भारत योजने अंतर्गत परभणी जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकत आहे. जिल्ह्यात विकासाच्या दृष्टिकोनातून अजून कोण-कोणत्या उपाययोजना करता येतील. यासाठी आपण सदैव कटिबद्धी राहणार आहोत. केंद्र सरकारकडून अनेक कल्याणकारी योजनेसाठी भरघोस अशा निधीची मागणी करुन, त्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा करु व त्यात आपण कुठलीही कसर सोडणार नाही, असे आश्वासन भाजपाच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.....
0 टिप्पण्या