🌟जगामधील वैरभाव संपविण्याच सामर्थ्य तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारात आहे....!


🌟भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचे प्रतिपादन🌟


पुर्णा (दि.०१ आगस्ट २०२३) - पुर्णा येथील बुद्ध विहार या ठिकाणी श्रावण पौर्णिमे निमित्त वर्षावास अधिष्ठान धम्मदेशना व वृक्षारोपण सत्कार समारंभाचे आयोजन आज मंगळवार दि.०१ ऑगस्ट २०२३ रोजी अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


प्रमुख पाहुणे म्हणून पूर्णा पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप काकडे जालना जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांची उपस्थिती होती.श्रावण पौर्णिमेच औचित्य साधून सकाळी साडेपाच वाजता परित्रान सुत्रपाठ करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासिकांची संख्या होती.दुपारी साडेबारा वाजता सामूहिक बुद्ध वंदना पूजा विधि व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी बुद्ध धम्म तत्त्वज्ञान जगामध्ये श्रेष्ठ आहे.प्रत्येकान ते आचरणात आणलं पाहिजे. भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांचं धम्मकार्य खूप महान आहे.यावेळी बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी वृक्षांची रोपे व ट्री गार्ड देण्याचे अभिवचन दिले.आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी श्रावण पौर्णिमेचे महत्त्व डाकू अंगुली माल यांची धम्मदीक्षा पहिली धम्म संगिनी  याविषयी यथोचित संबोधित केले . जगांमधला वैर भाव द्वेष भावना संपवण्याच सामर्थ तथागत भगवान बुद्धांच्या विचारात आहे . जगाला युद्ध नको आहे बुद्धांची करुणा आणि मंगल मैत्रीची आवश्यकता आहे.लेह लद्दाख धम्म सहलीवरून परतलेल्या उपासक-उपासिकांचा याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला.

सहलीमध्ये सहभागी झालेले सेवानिवृत्त पाटबंधारे अधिकारी इंजिनीयर पीजी रणवीर यांनी लेह लदाख येथील येथील बुद्ध धम्म तेथील भव्य आणि दिव्य बुद्ध विहारे.आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्रे तेथील संस्कृती या विषयी माहिती दिली.यावेळी पूर्णा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैया खंदारे माजी आरोग्य सभापती नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड नगरसेवक मधुकर गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष शामराव जोगदंड सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे पत्रकार मंचक खंदारे ज्येष्ठ धम्म उपासक अमृत मोरे वा.रा. काळे भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष बौद्धचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी बौद्धाचार्य उमेश बाराटे  आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम भालेराव सुरज जोंधळे प्रकाश जगताप आदींनी परिश्रम घेतले.खीर दान चिवर दान नांदेड येथील उपासिका गंगासागर अशोक पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व लेह लदाक येथील आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्राकडून भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांना दिलेल्या सन्मानपत्राचे वाचन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले.कार्यक्रमास ग्रामीण भागातून व पूर्णा शहरातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या