🌟राज्यात गुटखा तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा लागू असतांना देखील परभणी जिल्ह्यात सर्रासपणे अवैध गुटखा विक्री...!


🌟संभाजी सेने कडून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी🌟

परभणी (दि.०६ आगस्ट २०२३) : महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अवैध गुटख्यासह जंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध घालणारा कायदा लागू असतांना देखील प्रतिबंधित गुटख्याची शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे खुलेआम विक्री होतांना दिसत आहे परंतु पोलिस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाद्वारे त्याकडे जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष केल्या जात आहे.

               कोट्यावधी रुपयाचा महसुलावर पाणी सोडत राज्य सरकारने गुटखाबंदी कायदा केला, मात्र हाच प्रतिबंधक गुटखा आता काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. परभणी शहरासह प्रत्येक तालुक्यात व गावा-गावात या गुटखा माफियाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले गेले आहे, जवळच्या राज्यातून हा गुटखा रात्रीच्यावेळी शहरात आणला जातो, त्यानंतर पध्दतशीरपणे त्याची व्रिक्री केल्या जाते. शहरासह तालुक्यात पान टपरी, किराणा दुकानातही गुटखा विक्रीसाठी ठेवल्या जातो आहे. या गुटखा विक्रीतून स्थानिक गुटखा माफियांची कोट्यावधीची कमाई सुरू आहे. परंतु, त्या विरुद्ध कारवाई होत नाही. या गुटखा माफीयांना लगाम लावण्याची आवश्यकता आहे, अपेक्षा संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

              गुटखा माफियाकडून ठोक भावात घेतलेला गुटखा किरकोळ व्यापार्‍यांना विकणार्‍यांची एक टोळी शहरात व प्रत्येक तालुक्यात सक्रिय आहे. या टोळीद्वारे पहाटेच दुचाकीवरुन संबंधित किरकोळ व्यावसायिकांना गुटख्याचा पुरवठा केला जातो.  शहरात दररोज रात्रीच्या वेळी लाखो रुपयांच्या गुटख्याची आवक होत आहे. परंतु, या गुटखा माफीयावर पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाद्वारे कुठलीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे या प्रकरणी आपण लक्ष देवून गुटखा माफियांना लगाम लावावा, अशी मागणीही पवार यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या