🌟राज्याचे गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा परभणी जिल्हा दौरा.....!


🌟आज सोमवार, दि. 14 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 12 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथे झाले आगमन🌟

परभणी (दि.14 ऑगस्ट, 2023) : महाराष्ट्र राज्याच्या गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे हे दि. 14 व 15 ऑगस्ट, 2023 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे. आज सोमवार, दि. 14 ऑगस्ट, 2023 रोजी रात्री 12 वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथे आगमन व मुक्काम करतील.

तसेच मंगळवार, दि. 15 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 8.55 वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रयाण करतील. सकाळी 09.04 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. सकाळी 09.05 वाजता ध्वजारोहणाकरिता उपस्थित राहतील. सकाळी 09.20 वाजता स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान त्यांची वीर शौर्य पत्नी, वारस व उपस्थितीत नागरीकांची भेट घेतील. सकाळी 09.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महसूल सप्ताह कॉफी टेबल बुकचे अनावरण व महसूल सप्ताहाचे व्हिडीओ सादरीकरण कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथून रेणाखळी ता. पाथरी कडे प्रयाण करतील. सकाळी  11.30 वाजता जिल्हा परिषद शाळा रेणाखळी ता. पाथरी येथे आगमन व कॉम्पूटर लॅब लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. रेणाखळी ता. पाथरी येथून सोईनूसार औरंगाबादकडे प्रयाण करतील......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या