🌟सेवानिवृत्तिचे औचित्य साधून बोर्डातील इतर सहकाऱ्यांनी त्यांचा केला सामूहिक सत्कार🌟
नांदेड (दि.02 ऑगस्ट 2023) : येथील सुप्रसिद्ध धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड नांदेड येथे कार्यरत वरिष्ठ सुपरवाइजर अधिकारी सरदार हरभजनसिंघ संधू हे दि. 31 जुलै 2023 रोजी 41वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहे. तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या सचखंड पत्र मासिक पत्रिकेत कार्यरत कम्पोजिटर आणि प्रिंटर स.नरजीतसिंघ हे देखील जवळपास 39 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. हरभजनसिंघ संधू हे सुपरवाइजर पदावर कार्यरत होते आणि त्यांनी बोर्ड अंतर्गत वेगवेगळ्या पदावर आपली सेवा बजावलेली आहे.
त्यांनी अनेक वर्षें रोखपाल म्हणून देखील कार्य केले. तसेच भंडारपाल म्हणूनही जवाबदारी पार पाडली. तर नरजीतसिंघ यांनी सचखंड पत्रिकेत निरंतर सेवा केली. दि. 31 जुलै रोजी दुपारी गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. ठानसिंघ बुंगाई यांनी श्री हरभजनसिंघ संधू आणि नरजीतसिंघ यांना एकत्रितपणे शाल, सिरेपाव देऊन त्यांच्या कार्यांचा गौरव केला. यावेळी सहायक अधीक्षक शरणसिंघ सोढी, हरजीतसिंघ कडेवाले, बलविंदरसिंघ फौजी, जयमलसिंघ ढिल्लों, परविंदरसिंघ विष्णुपुरीकर, विक्रमजीतसिंघ कलमवाले, रविंदरसिंघ हजुरिया, नरिंदरसिंघ सुखाई, दरबारासिंघ, जसबीरसिंघ शाहू, देविंदरसिंघ सह इतर कर्मचारी उपास्थित होते. सेवानिवृत्तिचे औचित्य साधून बोर्डातील इतर सहकाऱ्यांनी देखील त्यांचे सामूहिक सत्कार केले....
0 टिप्पण्या