🌟यावेळी वसतिगृह अधीक्षक प्रमोद अंभोरे यांनी पंचप्रण शपथ यांचे वाचन करून त्याचे अर्थ व महत्व समजाऊन सांगितले🌟
परभणी (दि.०९ ऑगस्ट २०२३) - परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर आय.टी.आय. कॉर्नर जिंतूर रोड येथील माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह येथे आज बुधवार दि.०९ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 'मेरी माटी, मेरा देश' या अभियानांतर्गत पंचप्रण शपथ विद्यार्थी सहभागातून घेण्यात आली.
यावेळी वसतिगृह अधीक्षक प्रमोद अंभोरे यांनी पंचप्रण शपथ यांचे वाचन करून त्याचे अर्थ व महत्व समजाऊन सांगितले, यावेळी वसतिगृह अधीक्षक प्रमोद अंभोरे, कर्मचारी प्रकाश वडधुतीकर, शिकवणी शिक्षक शेख अझहर, संगणक प्रशिक्षक संदीप वायवळ, लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, समाजहित न्यूज परभणी तालुका प्रतिनिधी प्रदीप लांडगे तसेच वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या