🌟पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा 'इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन' तर्फे तीव्र निषेध....!

 


🌟कठोर कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी🌟 

परभणी  - जळगाव जिल्ह्यातील मधील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर दिनांक दहा ऑगस्ट रोजी भर चौकामध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे , त्याचा तीव्र निषेध इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन तर्फे करण्यात आला असून संबंधित गुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करून कडक शासन करण्याची मागणी जेष्ठ पत्रकार तथा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नविदिल्ली, महाराष्ट्र चे परभणी जिल्हाध्यक्ष मदन (बापु ) कोल्हे यांनी परभणीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे .

राज्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात आला असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे सत्य बातमी लिहिणाऱ्या पत्रकारांना काम करणे अवघड झाले आहे ,पत्रकारांचे /माध्यम प्रतिनिधींचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे .गुंडा मार्फत अवैध धंदेवाले,गैरकार्य करणाऱ्यां तर्फे पत्रकारावर हल्ल्याचे हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत पाचोर्‍याचे पत्रकार संदीप महाजन यांनी एका घटने संदर्भात बातमी दिली असता पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी महाजन यांना हा हल्ला होण्याअगोदर फोनवरून अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली होती ,या घटनेची क्लिप व्हायरल झाल्यानंतर माध्यमांमध्ये बरीच खळबळ माजली होती ,त्यानंतर आता संदीप महाजन हे रेल्वे आंदोलनाचे वार्तांकन करून येत असताना त्यांचेच वडिलांचे नावाने असलेल्या चौकामध्ये चार गुंडांनी येऊन संदीप महाजन यांचे वाहन अडवून , त्यांना वाहनावरून खाली पाडून लाथा बुक्क्यांनी  बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला केला ,यासंबंधी संदीप महाजन यांनी आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी माझे वर जीवघेणा हल्ला केल्याने मला व माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याचे पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पत्रकारावरील हल्ल्याविरोधात पत्रकार संरक्षण कायद्द्याअंतर्गत कडक कार्यवाही करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे ,त्यानुसार संदीप महाजन यांचे वरील हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेल्या संजीव कुमार कोटेचा यांचे मार्गदर्शनाखालील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन चे परभणी जिल्हाध्यक्ष मदन (बापू )कोल्हे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे परभणीचे जिल्हाधिकाऱ्यामार्फत दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्री दत्तु शेवाळे यांच्या कडे सादर केलेल्या सदरील निवेदनावर परभणी जिल्हा अध्यक्ष मदन बापू कोल्हे,सचिव डॉ.प्रविण खरात ,मिडीया चिफ देवानंद वाकळे, विद्याधर साळवे अ.रहिम आदींच्या सह्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या