🌟लेखी निवेदन बिल्डींग पेन्टर बांधकाम मजुर संघ जि.वाशिम यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर🌟
फुलचंद भगत
वाशिम:-मजुर,कामगारांना शासनाच्या योजनेसाठी लाभ घेन्याच्या दृष्टीकोणातुन ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपञ आवश्यक असते परंतु पाञ असुनही अशा कामगार मजुरांना प्रशासकीय यंञणेकडून सदर प्रमाणपण देण्यास नकार मिळत असल्याने शासकीय योजनेपासुन मजुर वंचित राहत असल्याने अशा कामगारांना यंञणेकडून प्रमाणपञ ऊपलब्ध करून द्यावे अन्यथा ऊपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन बिल्डींग पेन्टर बांधकाम मजुर संघ जि.वाशिम यांच्या वतीने प्रशासनाला दिले आहे.
निवेदनाचा आशय असा की,निवेदनकर्ते हे बिल्डींग पेन्टर, बांधकाम कामगार मजुर असुन आजपावेतो सबंधित कार्यालयाकडुन नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले नाही.सर्व मजुर हे कामगार संघटनेचे कार्यकर्ते असुन वारंवार लेखी तथा मौखीकरित्या कळविले असता आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.यामुळे जे खरे कामगार मजुर आहेत ते या योजनेपासुन वंचीत राहत आहेत व खोटया कामगारांची नोंद होवुन त्यांना प्रमाणपत्र मिळत आहेत असे निदर्शनास आलेले आहे.प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कामगारांची नोंदणी होत नाही.कामगारांची नोंद न झाल्यामुळे काम करतांना काही अपघात झाल्यास किंवा अनुचीत घटना घडल्यास जबादार कोण राहील ?यामुळे नोंदणी प्रमाणपत्र देण्याची विनंती निवेदनाव्दारे केली आहे. तसेच ज्यांच्याकडे संघटनेचे सभासदत्व आहे त्यांचीच नोंदणी करण्यात यावी कारण यामध्ये सुध्दा खुप मनमानी कारभार सुरु असल्याचे
निदर्शनास आलेले आहे.तरी प्रशासनाने या बाबीचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन बिल्डींग पेन्टर बांधकाम मजुर संघ जि.वाशिम येथील कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा नाईलाजास्तव जिल्हाधिकारी वाशिम यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल व होणार्या नुकसानीस व कार्यवाहीस प्रशासन जबाबदार राहिल असे निवेदनात नमुद आहे.सदर निवेदनावर बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजुर संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष शे.युनुस अ.ईसा,ऊपाध्यक्ष गोपाल वानखडे,सचिव रियाज खान,सहसचिव अब्दुल गणी,कोषाध्यक्ष फारूख खान,सल्लागार अजमत खान,,सिकंदर शहा,संघटक संदिप हरिहर,सदस्य मो.इरफान, निजाम मुन्नीवाले,शेख युनूस अइसा,अजमतखाॅ खाजाखा,अ.गणी शेख इस्माईल,काजी नईम,ग्यासोद्दीन,रियाज खान,गोपाल वानखडे,अ.इरफान,अब्दुल,अ,अलिम,मो.नाजीम,विजय बडवे,सुनिल ऊंदरे,वाजीद,फारुफ खान आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या