🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नियमांचे पालन करुन निर्णय घेतला जाईल - राहुल नार्वेकर

*भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 उतरून इतिहास रचला; इस्त्रोचे व 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण ; भारताचे चंद्रावर  पहिले यशस्वी पाऊल ठेवून चंद्रावर फडकवला तिरंगा  

*'मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण!' चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 चा इस्रोसाठी व भारतीयांसाठी  खास मेसेज

*नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कांदा लिलाव सुरु होणार; भारती पवारांची मध्यस्ती

 *दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा आता वर्षातुन दोनदा होणार 11 आणि 12 वी घ्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करता येणार, नवे नियम 2024 पासून लागू!

*संजय राऊतांच्या अंगात आलेलं उतरलंच नाही, म्हणून सरकारही गेलं - आ.डॉ विश्वजीत कदम

 *'अकेला ही एकनाथ खडसे भारी था', उभं राहून कामं केली, -- एकनाथ खडसे

*नाफेडतर्फे कांदा खरेदी म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण,  स्वाभिमानीची जोरदार टीका

 *भाऊसाहेब वाकचौरेंनी 'शिवबंधन' बांधले, उद्धव ठाकरेंची शिर्डीत ताकद वाढली

 *भारतीय ग्रॅडमास्टर 18 वर्षीय प्रज्ञानानंदने नंबर वन कार्लसनचा घामटा काढला

*शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे  --अजित पवार*

*मनसूख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मांना जामीन मंजूर

*16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नियमांचे पालन करुन निर्णय घेतला जाईल - राहुल नार्वेकर

*चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंगमुळे संपूर्ण भारतातील सर्व शहरांमध्ये फटाक्याची फोडून व पेढे वाटून नागरिकांनी आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला

*विचारांची ताकद शरद पवार यांना महाराष्ट्राला सांगायची आहे - रोहीत पवार

*मराठवाडा मुक्ती मोर्चाकडून स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीसाठी रथ यात्रा

*कांद्याचा बेमुदत लिलाव बंदचा आजचा तिसरा दिवस; कांदा रस्त्यावर टाकून निषेध

*राज्य सरकारने भंपकपणा करु नये, कांद्याला 4 हजार रुपये भाव द्यावा -- शेतकऱ्यांचे लढाऊ नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा

*आमदार सत्यजीत तांबे यांनी धरला डीजेवर ठेका

*छगन भुजबळांवर कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन करणार - ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे

*संस्था चालकाने मागणी केलेल्या लाचेची रक्कम स्विकारताना आण्णासाहेब विभुते विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक व शिपाई अँन्टी करप्शन विभागाच्या जाळ्यात*

* चंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना

* जवाहरलाल नेहरू यांनी देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केलं त्या प्रयत्नांचं आज चीज झालं - शरद पवार

* चंद्रापर्यंत पोहोचणारा विश्वामध्ये पहिला भारत देश आहे -  नवनीत राणा

 * शेतकऱ्यांच्या मालाला टॅक्स लावला जाणार नाही, पणन मंत्री अब्दुल सत्तार

* चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेनंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधिमंडळ कर्मचाऱ्यांचा जल्लोष

* उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयासमोरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून चांद्रयान-3  च्या यशस्वी लँडिंग प्रक्षेपणाचा आनंद घेतला

* जालन्यात बदली रद्द झाल्याचा जल्लोष साजरा करणे महावितरण अभियंत्याच्या अंगलट ; अभियंता प्रकाश चव्हाणांसह 30 वीज कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

* देशात संविधान आणि लोकशाही वाचवण्याची काँग्रेसची लढाई, राज्यात पदयात्रआ काढणार; नाना पटोले यांची माहिती

* एकाचवेळी दोन विमानांना टेक ऑफ आणि लँडिंगचे निर्देश; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला

* सेन्सेक्स 213 अंकांनी वाढून बंद, चांद्रयान-3 मुळे स्पेस स्टॉक्स तेजीत

* तेजस लढाऊ विमानावरुन 'अस्त्र'क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

* भारतात विकल्या जाणाऱ्या एकाही कारची चाचणी करणार नाही; GNCAPचा धक्कादायक निर्णय

* आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणीत दिरंगाई होणार नाही:विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती, म्हणाले - कर्तव्याचे भान, योग्य निर्णय घेणार

* MPSC टंकलेखक-कर सहाय्यक पदासाठीचा अंतिम निकाल घोषित:लातूरचा सूरज फडणीस, कोल्हापूरचा विनायक वजरेकर प्रथम 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या