🌟नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा प्रशासक पदाचा पदभार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्विकारला..!


🌟मावळते प्रशासक सरदार पि.एस.पसरीचा यांनी त्यांच्याकडे आपल्या पदाचा पदभार सुपूर्द केला🌟


नांदेड (दि.०४ आगस्ट २०२३) - नांदेड येथील जगप्रसिध्द ऐतिहासिक पवित्र सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक म्हणून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत यांनी नुतन प्रशासक म्हणून काल गुरुवार दि.०३ आगस्ट २०२३ रोजी पदभार स्विकारला मावळते प्रशासक सरदार पि.एस.पसरीचा यांनी त्यांच्याकडे आपल्या पदाचा पदभार सुपूर्द केला.

पवित्र सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारा बोर्डाचे पुर्व प्रशासक सरदार पि.एस.पसरीचा यांचा कार्यकाळ ३१ जुलै २०२३ रोजी संपल्यामुळे शासनाने नुतन प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या