🌟परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातल्या लिंबा येथे रस्ता रोको आंदोलन सूरु...!


☀️लोकप्रतिनिधीनी आश्वासन देऊन दुर्लक्ष केल्यामुळे आज गावकर्‍यांच्या वतीने सर्व पक्षीय आंदोलन - बालासाहेब सहजराव

परभणी (दि.१६ आगस्ट २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील लिंबा गावकर्‍यांच्या वतीने प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी हा पाथरी ते सोनपेठ रस्ता वाहतुकी योग्य न राहिल्यामुळे लिंबा गावकर्‍यांच्या वतीने आज बुधवार दि.१६ आगष्ट रोजी सकाळपासूनच लोकशाही मार्गाने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना रितसर निवेदन देऊन लिंबा गावात रस्ता रोको आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे.


प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी हा मार्ग पाथरी सोनपेठ या दोन तालुक्याला जोडणारा असुन तो पुढे बीड व लातुर या दोन जिल्यातुन गेलेला आहे पण हा रस्ता अमराई फाटा ते सोनपेठ पर्यत अत्यंत खराब झालेला आहे तो तात्काळ दुरूस्त करावा यासाठी लिंबा ग्रामपंचायतीच्या वतीने दि.३१ जुलै २०२३ रोजी दुरूस्तीसाठी जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला होता त्यानुसार आज बुधवार दि.१६ आगस्ट रोजी लिंबा गावकर्‍यांच्या वतीने आज लिंबा येथे सकाळी आठ वाजल्यापासुन रस्ता रोको आंदोलन चालु करण्यात आले आहे.

🔴 संतप्त प्रतिक्रिया :-

☀️लोकप्रतिनिधीनी आश्वासन देऊन दुर्लक्ष केल्यामुळे आज गावकर्‍यांच्या वतीने सर्व पक्षीय आंदोलन - बालासाहेब सहजराव

प्रस्तावित ५४८ बी राष्ट्रीय महामार्ग पाथरी ते सोनपेठ या रस्त्याला महामार्गाचा दर्जा मिळाला असुन सुध्दा लोकप्रतिनिधीनी आश्वासन देऊन दुर्लक्ष केल्यामुळे आज गावकर्‍यांच्या वतीने सर्व पक्षीय आंदोलन लेखी मिळाल्याशिवाय हे चालु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे लिंबा ग्रामपंचायत सदस्य बालासाहेब सहजराव यांनी म्हटले आहे.....

☀️पाथरी ते सोनपेठ महामार्गाच्या दुरावस्थेला लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा जवाबदार - सुरेश शिंदे.

 परभणी जिल्ह्यांच्या निष्क्रिय लोकप्रतिनीधीच्या नाकर्तेपणामुळे ५४८ बी या पाथरी ते सोनपेठ हा महामार्ग दुर्लक्षित राहिला असून यामुळे मार्गाला जोडणाऱ्या गावांतील सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या महार्गाच्या झालेल्या दुरावस्थेला संपूर्णतः जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणाच जवाबदार असल्याचे स्पष्ट मत सुरेश शिंदे यांनी व्यक्त केले....     .

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या