🌟गौर जिल्हा परिषद शाळा,आरोग्य उपकेंद्र व अंगणवाड्यांतील आरओ प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा🌟
पुर्णा (दि.१२ आगस्ट २०२३) - पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायत प्रशासनाला गौर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह गावातील अंगणवाड्या तसेच आरोग्य उपकेंद्रात पिण्यासाठी स्वच्छ व निर्जंतूक पाणी उपलब्ध व्हावे याकरिता शासनाकडून लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर देखील आरओ-आधारित जल निस्यंदन प्रणाली कार्यान्वित नसल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना अस्वच्छ व दुषित पाणी प्यावे लागत आहे याही पेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे आरोग्य उपकेंद्रात देखील आरो प्रणाली कार्यान्वित नसल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्नांसह येथील डॉक्टर आरोग्य सेविकांसह अन्य कर्मचाऱ्यांना स्वतः निर्जंतूक पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही.
गौर ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह गावातील अंगणवाड्या तसेच आरोग्य उपकेंद्रात आरओ-आधारित जल निस्यंदन प्रणाली तात्काळ कार्यान्वित करावी या मागणीचे निवेदन गावातील सामाजिक कार्यकर्ते मुंजाजी नागोराव जोगंदड यांनी काल शुक्रवार दि.११ आगस्ट २०२३ रोजी गौर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना दिले असून येत्या १४ आगस्ट २०२३ पुर्वी मागणी मान्य न झाल्यास दि.१४ आगस्ट २०२३ रोजी गौर ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येणार असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला असून या निवेदनाच्या प्रतिलिपी पुर्णा पंचायत समिती कार्यालय पुर्णा,तहसिल कार्यालय पुर्णा तसेच चुडावा पोलिस प्रशासन,पुर्णा पोलिस प्रशासनाला देखील देण्यात आल्या आहेत....
0 टिप्पण्या