🌟पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील भारतीय सैन्य दलात भरती झालेले जवान चंद्रकांत बोबडे यांचे जल्लोशात स्वागत...!


🌟पुर्णा शहरासह मुळगावी माटेगावात देखील ठिकठिकाणी जंगी स्वागत🌟

पुर्णा (दि.आगस्ट २०२३) - पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील चंद्रकांत दशरथ बोबडे यांची भारतीय सेना दलात गतवर्षी निवड झाली उत्तरांचल येथे सात महिन्याचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून शुक्रवारी गावी परतल्यानंतर त्यांचे जल्लोषात पूर्णा शहरासह मुळगावी माटेगावात देखील ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या तरूणांनी पुर्णा ते माटेगाव अशी भव्य दुचाकी रॅली काढून देशभक्तीपर गीत वाजवत भारतीय सैन्य दलातील चंद्रकांत बोबडे माटेगावात आणून येथे देखील त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोशात स्वागत केले यावेळी गावातील माता भगिनींनी त्यांना ओवाळून त्यांचे औक्षण केले चंद्रकांत बोबडे यांचे लहानपणापासूनच भारतीय सैन्य दलात भरती होऊन देश सेवा करायचे स्वप्न होते त्यांच्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी अधिक परिश्रम करून खऱ्या अर्थाने आई-वडिलांचे स्वप्न साकार केले यावेळी गावकऱ्यांनी पहिल्यांदाच गावात आल्याने स्वागतासाठी रांगोळी पुष्पाच्या वर्षाव करून मिरवणूक काढली आणि घरोघरी त्यांचे महिलांनी औक्षण केले यावेळी पवन एकनाथराव बोबडे आदिनाथ बोबडे गोपाळ बोबडे गजानन बोबडे रमेश बोबडे मोतीराम बोबडे सोपान बोबडे माणिक बोबडे माऊली गिराम आधी सह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या