🌟पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील गोदावरी नदीच्या पुलावरारून उडी टाकून परभणीतील युवकाची आत्महत्या...!


🌟युवकाचा मृतदेह धानोरा काळे येथे ३६ तासानंतर पाण्यावर तरंगून आल्याने लागला हाती🌟


पुर्णा (दि.११ आगस्ट २०२३) - पुर्णा तालुक्याल्या धानोरा काळे येथील गोदावरी नदीच्या पुलावरून परभणी येथील बेलेश्वर कॉलनीतील रोहीत गणेशराव राऊत वय वर्षे २३ या युवकाने पाण्यात उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवार दि.०९ आगस्ट २०२३ रोजी सायंंकाळी ०७-३० वाजेच्या सुमारास घडली होती आज शुक्रवार दि.११ आगस्ट २०२३ रोजी सकाळी ०९-०० वाजण्याच्या सुमारास तब्बल ३६ तासानंतर त्याचे प्रेत पाण्यावर तरंगून आल्याने हाती लागले आहे.

या घटने संदर्भात अधिक माहिती अशी की मयत रोहित गणेशराव राऊत हा युवक बुधवारी पालम येथे कामानिमित्त जात असताना धानोरा काळे येथील गोदावरी गंगेच्या पुलावर त्याने आपली दुचाकी सोडून दिली होती घरच्या मंडळींसह नातेवाईक व मित्रांनी फोन करूनही त्याचा संपर्क होत नव्हता. दुचाकी आढळली तेथून पुलावरून पाण्यात उडी मारून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता यावरून मयताचा भाऊ गौरव गणेशराव राऊत याने काल गुरूवार दि.१० आगस्ट २०२३ रोजी ताडकळस पोलीस स्थानकात आपला भाऊ बेपत्ता असल्याची मिसिंग दाखल केली होती. त्यावरून ताडकळस पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक कपिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणेश लोंढे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर तरडे,रामा सोंळखे, चंदेल,वाहनचालक विजय चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून शोधाशोध घेतला असता, त्यादिवशी तो दिसून आला नाही. परंतु आज शुक्रवार दि.११ आगस्ट रोजी सकाळी धानोरा काळे येथे गोदावरी नदीतील पाण्यावर मयताचे प्रेत तरंगत असल्याचे दिसून आले. गावकर्‍यांनी याबाबत ताडकळस पोलिस प्रशासनाला कळविले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद असलेला रोहित राऊत या युवकाचेच ते प्रेत असल्याचे स्पष्ट झाले. ताडकळस पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने प्रेत पाण्याच्या बाहेर काढून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी प्रेत प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा काळे येथे पाठवण्यात आले. यावेळी डॉ.शुभम चव्हाण यांनी शवविच्छेदन केले व अंत्यविधीसाठी प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  पोलीस मयताच्या आत्महत्येचे कारण शोधत असून ताडकळस पोलीस ठाण्यात शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत या गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या