🌟दुर्घटनेत ०६ कामगार बचावले तिघांनी उडी मारून जिव वाचवला🌟
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना/दुर्घटनांची मालिका सातत्याने सुरुच असून शहापूर तालुक्यातील सरलांबे जवळ सिमेंटचे पुलाचे भाग उचलणारे महाकाय मशीन कोसळले. त्या खाली अनेक कामगार दाबले गेले आतापर्यंत २२ पैकी १६ जणांचा मृत्यू झाला असून दुर्घटनेत ०६ कामगार बचावले तिघांनी उडी मारून आपला जिव वाचवला आहे.एका जखमीला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.
त्या ठिकाणी २२ कर्मचारी काम करत होते. त्यात १६ जणांचा मृत्यूसमृद्धी महामार्गावर शहापूरजवळ मोठी दुर्घटना रात्री उशिराच्या सुमारास घडली असून कोसळलेलं लाँचर दूर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत बचाव कार्यासाठी समृद्धीच्या कामगारांसह पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकारी पाहाणी करत आहेत. दादा भुसे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली जात आहे.
घटनास्थळावरचे हे फोटो विदारक आहेत. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा तिथे २२-२५ मजूर काम करत होते. मृत मजूर हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असल्याचं सांगितलं जातंय...
0 टिप्पण्या