🌟पुर्णा शहरातील भदंत उपाली थेरोनगर येथील जेष्ठ धम्म उपासिका कोंडाबाई सातोरे काळाच्या पडद्याआड.....!


🌟आपल्या गीताच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये भीम बुद्ध गीते गाऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन केले🌟

पुर्णा (दि.११ आगस्ट २०२३) - पुर्णा शहरातील भदंत उपाली थेरोनगर येथील ज्येष्ठ धम्म उपासिका कोंडाबई पांडुरंग सातोरे यांचे आज शुक्रवार दि.११ आगस्ट २०२३ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले सुप्रसिद्ध शाहीर प्रबोधनकार आंबेडकरी व धम्म चळवळीचे निष्ठावंत पाईक विजय सातोरे जिल्हा मध्यवर्ती बँक परभणी चे कावलगाव शाखेचे शाखाधिकारी रावसाहेब सातोरे यांच्या त्या आई होत्या त्यांच्या पश्चात मुलगी द्रोपदाबाई त्रंबक नरवडे मुले गंगाधर पांडुरंग सातोरे अनिल पांडुरंग सातोरे अशा प्रकारचा परिवार आहे.

एक आदर्श व संस्कार क्षम माता म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जायच.निसर्गतः गोड गळ्याची देणगी त्यांना लाभली होती.आपल्या गीताच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये भीम बुद्ध गीते गाऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले.

गौतमाच्या चरणी पुष्प वाहिले

साकार झाले स्वप्न पाहिलेले

हे गीत ज्यावेळी त्या गायच्या

त्यावेळी प्रेक्षकांमधून पुन्हा एकदा गाणं गाण्याची मागणी व्हायची सायंकाळी ०५-०० वाजता अखिल भारतीय भिकू संघाचे महासचिव भदंत डॉ उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यविधी पार पडला.यावेळी मोठ्या संख्येने सामाजिकधार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामधील मान्यवर आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेले महिला मंडळाचे पदाधिकारी हजर होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या