🌟मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास पुर्णेतील सकल मराठा समाज बांधवांचा पाठींबा..!


🌟शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणें आंदोलन🌟


पुर्णा (दि.०९ आगस्ट २०२३) - मुंबई येथील आझाद मैदानावर आज बुधवार दि.०९ आगस्ट २०२३ रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनास पाठींबा म्हणून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पुर्णा शहरातील शिवतिर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आज बुधवार दि.०९ आगस्ट रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

पुर्णेत मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास पाठींबा म्हणून आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनात स्वराज्य संघटनेचे केंद्रीय कार्यकारीनी सदस्य साहेबराव कल्याणकर,अजय कदम,संदिप कदम,विष्णू कदम,शरद कदम,महेश किरडे,गणेश बुचाले,सचिन उर्फ पप्पू कदम,लखन शिंदे,सोनाजी शिंदे,सतिष कदम,विकास कदम,सुंदर बुचाले आदींसह असंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते........


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या