🌟स्मरण गौरवशाली परंपरेचे : आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान🌟
गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या शुभहस्ते आज गंगाखेड येथे 'मेरी माटी, मेरा देश' या उपक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला.गंगाखेड नगरपरिषद अंतर्गत या देशभक्तीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ध्वजारोहण, शिलाफलक, वसुंधरा वंदन, पंचप्राण शपथ असे ऐतिहासिक परंपरेचा गौरव करणारे उपक्रम घेण्यात आले. तसेच लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान झाला.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देशभर 'मेरी माटी, मेरा देश' अर्थात माटी को नमन, विरोंको वंदन हा उपक्रम राबवून देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण केले जात आहे, असे लाडके आ.डॉ.रत्नाकर गुट्टे म्हणाले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, नपचे मुख्यधिकारी तुकाराम कदम, पालम नपचे संतोष लोमटे, पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे, उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, मार्केट कमिटी संचालक माणिकराव आळसे, सचिन महाजन, वैजनाथ टोले, राम मिरखे, सर्व आजी-माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी, नागरीक, व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या