🌟पुर्णा नगर परिषदेच्या भ्रष्ट बेईमानशाही कारभारा विरोधात माझी पुर्णा संघर्ष प्रतिष्ठाणचा यल्गार....!


🌟माझी पुर्णा संघर्ष प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राजु नारायणकर यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणाला आज सुरुवात🌟   

  


             
पुर्णा (दि.०९ आगस्ट २०२३) :- पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या बेलगाम भ्रष्ट बेईमानशाही कारभारा विरोधात आज बुधवार दि.०९ आगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून माझी पुर्णा संघर्ष प्रतिष्ठाणने यल्गार पुकारला असून पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहरात झालेल्या व होत असलेल्या कोट्यावधी रुपयाच्या निकृष्ट व बोगस दर्जाच्या रस्ते व नाली बांधकाम विरोधात माझी पूर्णा संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण  करण्यास सुरुवात केली आहे. 

पुर्णा शहरातील प्रभाग क्रमांक १.४.५.६.७.८.९. या प्रभागांमध्ये अत्यंत निकृष्ट व बोगस दर्जाचे  रस्ते नाल्याची बांधकाम बोगस गुण नियंत्रण अहवालाच्या आधारावर दर्जेदार दाखवून या बोगस कामांची  बिले अदा करण्यात आली आहे सदरील कामांची सखोल चौकशी करून संबंधित गुत्तेदारांसह अदा करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तत्काळ निलंबित करण्यात यावी या नगर या मागणीसाठी पूर्णा नगरपरिषदेच्या इमारती समोर दिनांक ०९ ऑगस्ट रोजी पूर्णा संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने अमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली असून या उपोषणात माझी पुर्णा संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक राजू नारायणकर,प्रकाश गायकवाड,रवी गायकवाड,दिलीप भालेराव,विशाल कांबळे,टेकाजी गायकवाड यांनी सहभाग नोंदवला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या