🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟राज्य सरकारने सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत देण्याचा घेतला निर्णय🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात एका उद्योगपतींच्या घरी झाली गुप्त बैठक ; या भेटीने महाराष्ट्रात विविध राजकीय चर्चांना पुन्हा उधाण 

* राज्य सरकारने सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत देण्याचा घेतला निर्णय

* पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेना उधाण

* राज्यातील काँग्रेस चवतळलेला वाघ आहे, भाजपला गारद करू - विश्वजित कदम

* मिरजेत 375 फुटी भव्य तिरंगा ध्वज रॅली संपन्न, ३२ शाळा २ हजार विद्यार्थी सहभागी

* पुण्याच्या वाहतूक कोंडीवर नितीन गडकरीनी सुचवला रामबाण उपाय ; लवकरच पुण्यात सुरु होणार हवेतून चालणाऱ्या बसेस

* दिल्ली सेवा विधेयकाचं अखेर कायद्यात रुपांतर

* राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शनसह चार विधेयकांना दिली मंजूरी 

* उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांदनी चौकाच्या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी ; वाॅर रुमवरून घेतला विरोधकांचा समाचार; या वेळी अजित पवारांनी पुण्यातील विविध रत्यांच्या व देवस्थानांच्या विचित्र नावांचा सांगितला इतिहास ; अजित पवारांनी आपल्या माहीतीत पुण्याच्या इतिहासाबद्दल भर घातली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मिश्किल प्रतिपादन 

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती खरोखरच खूप खराब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 15 आॅगस्ट नंतर दवाखान्यात बळजबरीने अ‍ॅडमिट करणार ; आमदार संजय शिरसाटांची माहिती

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील बस, मेट्रो, ट्रेनसाठी 'वन कार्ड योजना' सुरु करण्याची केली लोकहीतवादी सूचना

* सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही-- अजित पवार

* मुख्यमंत्री एक पद आहे मग एकाच खुर्चीवर दोघांचे डोळे कसे असणार?-- - अजित पवार

 * 2024 ला त्यांचा सूर्य उगवणार नाही, ते सूर्याचे मालक नाहीत ; सामनातून सरकारवर  हल्लाबोल

* अजितदादांसारखा नेता आमच्यासोबत असल्यामुळं पुण्याच्या विकासाला गती मिळेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* 86 कैद्यांची स्वातंत्र्यदिनी कारागृहातून होणार सुटका, कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी

* पुण्याला जुने दिवस आणा, पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या ----नितीन गडकरींचे आवाहन

* चांदणी चौकाच्या पुलाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मेट्रोने प्रवास

* आंबोली वर्षा महोत्सवाचा मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ

* छगन भुजबळ हे अमरावतीत 15 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी आले नाही तर जनता त्यांना उत्तर देईल - आमदार यशोमती ठाकुर 

* विरोधकांना  निधी न देण्याचा पायंडा  लोकशाहीला शोभणार नाही - आमदार विश्वजित कदम

* महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये 15 ऑगस्ट निमित्त बाजारपेठा सजल्या, चार चाकी व दोन चाकी गाड्यांसह  इलेक्ट्रॉनिक वस्तू व मोबाईल आदी  वस्तूंना नागरिकांकडूनही चांगली मागणी*

 * राज्यात तिन्ही पक्ष एकत्रपणे भाजपला विरोध करणार - पृथ्वीराज चव्हाण

* रुग्णांना जेनेरिक औषधं लिहून देणं बंधनकारक, औषधांच्या ब्रँडचा उल्लेख केल्यास कारवाई; डॉक्टरांसाठी NMC चे नवे नियम*

* पुनर्विवाह केलेल्या शहिदांच्या पत्नीलाही मिळणार आर्थिक लाभ, गृह विभागाचा निर्णय

* आसाममध्ये 'जलप्रलय' 175 गावे पाण्याखाली ;  हजारो लोकांना बसला फटका

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या