🌟हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील थोरला मठात २६ लाखांची चोरी...!


🌟या प्रकरणी कुरुंदा येथील रहिवासी जितेंद्र उर्फ ​​गणपत हरिहर महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल🌟  

हिंगोली (दि.०३ आगस्ट २०२३) - हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरातील थोरला मठ येथील श्री वेंदत्ताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या खोलीत २५ जुलै रोजी मध्यरात्री चोरी झाली होती.  अज्ञात आरोपींनी खोलीत ठेवलेले ०८ लाख, भाविकांनी दिलेले ३२ हजार रुपये, ६७ तोळे सोन्याची अंगठी व ०६ लाख किमतीचे लॉकेट, दानपेटीत मिळालेले ७० हजार रुपये, महाराजांची पर्स असलेली आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, एसबीआयचे एटीएम कार्ड असा ऐवज लंपास केला. आणि ॲपल कंपनीचा मोबाईल असा एकूण २६ लाख, २ हजार रुपयांचा माल चोरून नेला.  याप्रकरणी कुरुंदा येथील रहिवासी जितेंद्र उर्फ ​​गणपत हरिहर महाजन यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी दुपारी बसमत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४६१,३८० अन्वये गुन्हा दाखल करून सहायक पोलीस निरीक्षक बोधनापोड तपास करत आहेत.  माहिती मिळताच एसडीपीओ शेळके, सहायक पोलीस निरीक्षक बोधनापोड, सहायक पोलीस निरीक्षक भिंगारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या