🌟सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विना विलंब द्या.....!


🌟शिक्षक नेते डि.सी.डुकरे यांनी केली राज्याचे मुख्य सचिवांकडे मागणी🌟 

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला.परंतु वेतन आयोगाचा फरकाचा तिसरा व चौथा हप्ता शासनाकडून दिला गेला नाही.तो शासनाने विना विलंब द्यावा अशा प्रकारची मागनी शिक्षक नेते डी.सी.डुकरे यांनी केली. मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या,सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नासंबंधी नेहमी शासन दरबारी आवाज उठविणारे,टप्पा अनुदानावरील शिक्षकांचा वेतन अनुदानाच्या टप्प्यात वाढ करण्यात यावी.2005 पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षक,शिक्षकेतरांना जूनी पेंशन मिळावी यासाठी मराठवाडा विभागाचे ज्येष्ठ शिक्षक नेते डीसी डुकरे यांनी 1995 पासून आतापर्यंत शेकडो लढे दिले आहेत.

राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्याशी त्यांनी भ्रमणध्वनिवर दिनांक 22 ऑगस्ट रोजी वेतन आयोगाच्या तिसऱ्या व चौथ्या हाप्त्या यासंदर्भात आग्रही मागणी केली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  वेतन आयोगाचा थकीत तिसरा चौथा हप्ता  देण्यासंबंधात उचित कार्यवाही करू अशा प्रकारे भ्रमणध्वनी वरून आश्वासित केले आहे या संदर्भात शासन दरबारी आग्रही पाठपुरावा करणारे शिक्षक नेते डीसी डुकरे यांचे मराठवाड्यातील महाराष्ट्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त शिक्षक  यांच्यावतीने वतीने त्यांचे आभार मानले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या