🌟खा.डॉ.सुभाष भामरेंनी मंजूर करुन आणला नवीन अंडरपास मिलपरिसरासह शासकीय दूधडेअरी परिसराच्या समस्या सुटणार...!


🌟प्रविण अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश, लवकरच होणार भुमिपुजन🌟 

धुळे (दि.१८ आगस्ट २०२३) - खा.डॉ. सुभाष भामरे यांनी मिलपरिसरासह शासकीय दुध डेअरी रोड परिसरातील सुमारे 40 हजार लोकसंख्येच्या वसाहतींचा येण्या जाण्याचा महत्वाच्या रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यात यश मिळवले असून नवीन अंडरपास करण्यात येणार आहे. भाजपाचे माजी मंडल अध्यक्ष तथा भाईजी नगर गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन प्रवीण अग्रवाल, महिला बालकल्याण सभापती सारिका ताई प्रवीण अग्रवाल यांच्या पाठपुराव्यानुसार नवीन अंडरपास होणार असून त्याचे लवकरच भुमिपुजन होईल, अशी माहिती प्रविण अग्रवाल यांनी दिली आहे. 

मिल परिसरासह शासकीय दूध डेरी परिसरातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला दसेरा मैदान ते लक्ष्मीवाडी भागातील सुमारे चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या जनतेच्या जिव्हाळ्याचा हा रस्ता रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे रेल्वे गेट बंद केल्याने रस्ता बंद झाला होता. रेल्वे प्रशासनाने याच रस्त्याच्या बाजूने अर्थात एक किलोमीटर लांब एक बोगदा मार्ग तयार केला होता मात्र अबाल वृद्ध, विद्यार्थी काही नोकरदारांना हा हा बोगदा डोकेदुखी ठरत होता परिणामी जनतेची सुविधा होण्याऐवजी हालअपेष्ठा होत आहेत. ही समस्या या भागातील भाजपाचे माजी मंडल अध्यक्ष तथा भाईजी नगर गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन प्रवीण अग्रवाल, महिला बालकल्याण सभापती सारिकाताई प्रवीण अग्रवाल यांच्याकडे जनतेने मांडली. तिची दखल घेत प्रविण अग्रवाल यांनी देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा लोकप्रिय खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याकडे पाठपुरावा करीत बंद झालेल्या रस्ता सुरू करण्याची मागणी केली. 

* नवीन अंडरपासचे काम लवकरच :-

खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी काही महिन्यापूर्वी स्वतः रेल्वेक्रॉसिंगची पाहणी केली आणि नवीन अंडरपास सुरु करुन देवू असे आश्वासन जनतेला दिले होते. या आश्वासनाची लवकरच पूर्तता होणार आहे. रेल्वे प्रशासनाने पूर्वी सुरू असलेल्या रस्त्यावरच नवीन बोगदा सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्या असून या ठिकाणी आखणीचे काम कालच सुरू करण्यात आल्याची माहिती प्रवीण अग्रवाल यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. दरम्यान हा नवीन बोगदा व्हावा यासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांच्याकडे यांच्याकडे पाठपुरावा केला. नवीन अंडरपासची मंजूरी घेतली आणि लवकरच हा मार्ग अबाल वृद्धांसह जनतेसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती ही यावेळी प्रवीण अग्रवाल यांनी दिली आहे. 

* नागपुरात झाली बैठक :-

दसेरा मैदान ते लक्ष्मी वाडी शासकीय दूध डेअरी रोड या मार्गासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार्‍या या बोगद्यासाठी रेल्वे बोर्डाची विशेष बैठक नागपूर येथे 7 जुलै रोजी पार पडली. या बैठकीला रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष प्रशासकीय अधिकारी डी आर एम जी एम, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. विशेष म्हणजे धुळ्याहून खासदार डॉक्टर सुभाष भामरे या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्यासमवेत भाजपाचे माजी मंडल अध्यक्ष प्रवीण अग्रवाल हे देखील उपस्थित होते. या बैठकीत शासकीय दुध डेअरी परिसरातील सुमारे 40 हजार जनतेच्या तसेच हिरे वैद्यकीय महाविद्यालयात येणार्‍या रुग्णांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृद्ध यांच्यासाठी हा बोगदा होणे किती महत्त्वाचे आहे. हे यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सदरच्या बैठकीत प्रशासनाला पटवून दिले. त्याची दखल घेत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तात्काळ हा आदेश काढत बंद झालेल्या रेल्वे गेट जवळ नवीन अंडरपास झाला पाहिजे. असे आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. बंद झालेल्या रेल्वे गेट जवळ आखणीचे काम कालपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रवीण अग्रवाल यांनी दिली आहे. 

* महापालिका प्रशसनाचे विशेष आभार :-

दुधडेअरी रोडवरील नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी मनपा आयुक्त देविदास टेकाळे, अती आयुक्त विजय सनेर, अभियंता कैलास शिंदे, उप अभियंता चंद्रकांत उगले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य. अभियंता, कर्मचारी यांनी देखील मोठे सहकार्यक केले असून त्यांचे प्रवीण अग्रवाल यांनी आभार मानले आहेत. लोकांचा हा महत्वाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार असल्याने या भागातील जनतेने प्रवीण अग्रवाल या भागाच्या नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती सारिकाताई अग्रवाल यांचे आभार मानले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या