🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.....!


🌟स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण इंडो टिबिटियन बॉर्डर सैनिक रमेश कोहळे यांच्या हस्ते ध्वजारोहण🌟 


पुर्णा (दि.१५आगस्ट २०२३) - पुर्णा तालुक्यातील माखणी येथील ग्रामपंचायत व जिल्हा परीषद प्राथमिक शाळेमध्ये आज मंगळवार दि.१५ आगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण इंडो टिबिटियन बॉर्डर सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  माखणी जिल्हा परिषद शाळेमध्ये सैन्य दलातीतल्या इडो.टेबिटियन बॉर्डर जवान रमेश कोहळे,पत्नी सौ पूजा कोहळे , भारतीय जवान चद्रकात धुळशेटे ,प्रदीप शिराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण व शीला फलकाचे अनावरण भारतीय जवानाच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित  शिवाजी आवरगंड , सरपंच गोविंद आवरगंड, ग्रामसेवक बी. आर. कांबळे, प्रगतशील शेतकरी जनार्धन आवरगंड , कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचे सन्मान करण्यात आले यामध्ये शेतकरी प्रतिनिधी हरिभाऊ आवरगंड, मुंबई येथे पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत असणारे जयराम आवरगंड यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले . तेजस्विनी आवरगंड हिने आपल्या मनोगतात आपण जे मतदान करतो यामध्ये कुठलाही पैसा न घेता निस्वार्थपणे मतदान जर केले तर होणारा भ्रष्टाचार कमी होऊ शकतो . पुढे  आराध्या पौळ , गोपाळ आवरगंड ,अबोली, श्रद्धा ,कुणाल , रमेश कोहळे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला शाळाव्यवस्थापन  समिती उपाध्यक्ष बंडु गाडे, अनुरथ आवरगंड , नागनाथ नवघरे, संजय कुमार जोशी. राजकुमार ढगे,सुरज पौळ, सुनील शेळके .सारंग संगवे . वर्षा वैद्य. अश्विनी शाहाने. गीतांजली साबळे.गगाबाई डांगे .महानंदा भोसले,नदाबाई मुंजा आवरगंड  देवीदास पल्लपली , संतोष अंबोरे आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजयकुमार जोशी यांनी केले सुत्रसंचालन राजकुमार ढगे आभारप्रदर्शन  अश्विनी शहाणे यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या