🌟कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे पूर्वरत चालू करण्याची रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे आ.मेघनाताई बोर्डीकर यांची मागणी ?


🌟भाजपाचे जिल्हा संयोजक विजय कराड यांनी केली होती आ.मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे मागणी🌟  


 पूर्णा (दि.१८ ऑगस्ट २०२३) :- शेगाव रेल्वे स्थानकावर धावणाऱ्या सर्व गाड्यांना थांबा देण्यात यावा व कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या दैनंदिन नांदेड ते संभाजीनगर एक्सप्रेस पूर्ववत चालू करण्यात यावी अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री मा. रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे आ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दि. 18 ऑगस्ट रोजी एका लेखी पत्र द्वारे केली आहे मराठवाड्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री गजानन महाराज क्षेत्र शेगाव येथील रेल्वे स्थानकावर अकोला हिंगोली पूर्णा मार्गाने नांदेड बहुतांश जलद अतिजलद रेल्वे धावतात परंतु नांदेड लोकमान्य टिळक टर्मनेर  मुंबई  ला ये जा करणाऱ्या गाडी सह अनेक गाड्या या रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत मराठवाड्यातील मराठवाड्यातील भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन शेगाव रेल्वे स्थानकावर प्रत्येक गाडीला थांबा घ्यावा व तसेच नांदेड संभाजीनगर नांदेड ही दैनंदिन एक्सप्रेस चालवली जात असे सदरील गाडी ही मार्गावर अपडाऊन करणारे कर्मचारी व्यापारी विद्यार्थी यांच्या साठी  सोयीची होती सदरील गाडी ही कोरोना काळापासून बंद करण्यात आली असल्यामुळे  प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून सदरील गाड्या पूर्णरत सुरू  करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा संयोजक विजय कराड यांनी आ.मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याकडे केली होती याच मागणीची दखल घेत आ. मेघनादीदी बोर्डीकर यांनी  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या