🌟नांदेड जिल्ह्यातील फोटोग्राफर यांनी शासनाच्या योजनांचा लाभ आवश्य घ्यावा :- जिल्हाधिकारी अभिजित राऊत


🌟नांदेड येथील भासीन मंगल कार्यालयात आयोजित जागतिक छायाचित्र दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी केले प्रतिपादन🌟


नांदेड (दि.19 आगस्ट 2023) :-  नांदेड येथील असोसिएशन ऑफ प्रोफेशनल फोटोग्राफर्स यांच्या वतीने आज भासीन मंगल कार्यालय येथे जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत हेते यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले जिल्हाधिकारी यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले फोटोग्राफर यांची कला पाहता  मला देखील फोटोग्राफी शिकण्याची ओढ निर्माण होत आहे. प्रत्येकाने फोटोग्राफी करत असताना त्या फोटोग्राफी कडे एक कला प्रमाणे पाहिले पाहिजे असे वक्तव्य जिल्हाधिकारी यांनी केले.


     या वेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होतकरू हुशार विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच वैदिकीय क्षेत्र कार्यरत असेल तसेच सर्प मित्र यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी नांदेड मधील हावशी छायाचित्र पुरस्कार प्राप्त डॉ.सुशील राठी,डॉ.वाट्टमवर,डॉ.साटवरे सर्प मित्र प्रसाद शिंदे उपस्थित होते.


  कार्यक्रमाचे प्रमुखपाहूणे म्हणून असोसिएशन ऑफ प्रोफेशनल फोटोग्राफर्स संघटनेचे अध्यक्ष मा. गुणवंत पाटील हंगरगेकर, राघवेंद्र कट्टी  हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाठक यांनी केले तर आभारप्रदर्शन विजय शेटे यांनी केले  हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिवदास नीळकंठे, सुधाकर देशमुख, प्रविण पांडे, पिराजी गाडे, प्रकाश परभणकर, लक्षमन देवडे, आशिष पांडे, राजू घोरबांड, राहुल देशमुख (ठाकरे ), अतुल देशपांडे, गोपी टोणपे आदिनी परिसश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या