🌟परभणी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा....!


🌟‘शासन आपल्या दारी’ उपक्रम परभणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजन🌟 

परभणी (दि.०३ ऑगस्ट २०२३) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ‘योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी’ या अभियानांतर्गंत शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे. 

या अभियानांतर्गंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील क्रीडा संकुल मैदानावर पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथे १० वी ते पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा, आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नामांकित कंपन्यामार्फत पदभरती करण्यात येणार आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या