🌟महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मधील गैरप्रकार रोखण्यासाठी छत्रपति प्रतिष्ठान सज्ज...!


🌟पुर्णा तहसिलदार यांना छत्रपति प्रतिष्ठानने निवेदन देऊन चौकशीची केली🌟 

तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान डाऊन झालेले सर्व्हर, पहिल्याच दिवशी झालेले पेपर फुटण्याचे प्रकरण, म्हाडा भरती परीक्षा प्रक्रियेत झालेले गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे घडत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती प्रतिष्ठान च्या विद्यार्थी संघटनेकडून तहसिलदार पुर्णा यांना या सर्व प्रकरणांची चौकशी करत दोषींवर कारवाई करावी. तसेच अशा घटना पुन्हा घडू नये आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या धर्तीवर स्वतंत्र आयोग किंवा MPSC मध्ये स्वतंत्र विभाग निर्माण करावा व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले असून यावेळी छत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष पृथ्वीराज सूर्यवंशी पाटील, तालुका अध्यक्ष ओमकार कदम पाटील, कार्तिक यादव, शुभम कदम, राजू कुरे,राजू पळसकर, वसंत भिसे, कृष्णा कदम, रोहन कदम, स्वराज कदम, प्रसाद क्षीरसागर, प्रसाद हिवरे, राहुल गवते, ओमकार गायकवाड, मुंजा कदम, निलेश कदम व आदी विद्यार्थी व संघटन पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या