🌟महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे 16 आणि 17 ऑगस्ट रोजी दोन दिवसीय आयात निर्यात प्रशिक्षण शिबीराचे आयोजन....!


🌟त्यामुळे इच्छुकांनी अधिक माहितीसाठी सौ.जुहिता मकवाना यांच्याशी या 7972419698 क्रमांकावर संपर्क साधावा🌟

✍️ मोहन चौकेकर 

औरंगाबाद :  महाराष्ट्रा उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद तर्फे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 16 आणि 17 ऑगस्ट रोजी  सकाळी 11 ते 5 ही प्रशिक्षण शिबिराची वेळ असणार आहे.


या आयात निर्यात प्रशिक्षण शिबीरामध्ये प्रशिक्षणार्थीना खालील प्रमाणे माहिती मिळणार आहे. एक्सपोर्टची प्राथमिक माहिती, एक्सपोर्ट संधी, एक्सपोर्ट फायनान्स , एक्सपोर्ट प्रकार एक्सपोर्ट प्रक्रिया, एक्सपोर्ट व्यवसाय कसा सुरू करावा , एक्सपोर्ट लॉजेस्टिकशासकीय योजना , शिपींग डॉक्युमेंट, इम्पोर्ट प्रक्रिया , ओवरसिज एजंट कमिशन, विविध देशाचे निकष, इम्पोर्ट,FTA (भारताचे विविध देशांबरोबर होत असलेले व्यापार करार) , EXIM POLICY (भारताचे आयात-निर्यात विषयक धोरण) , Export Incentives  (भारत सरकारच्या निर्यात पूरक योजना) ,

Post Covid, Import-Export Opportunities ( कोविड महामारी नंतर, आयात-निर्यात व्यवसायाला निर्माण होणाऱ्या नवीन व्यवसाय संधी ) प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थीनां प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. या शिबीराचे प्रशिक्षण शुल्क 3540/-  असुन फक्त 30 जणांनाच प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संपर्क सौ. जुहिता मकवाना - 7972419698

कार्यक्रम समन्वयक एम.सी.ई.डी. औरंगाबाद , सौ. प्रतिभा निमकर  - 9028056800  जिल्हा प्रकल्प समन्वयक एम.सी.ई.डी. औरंगाबाद यांच्याशी संपर्क साधावा  असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED)  जिल्हा कार्यालय, एम. सी. ई. डी., अ-३८, एम.आय.डी.सी. एरिया, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद यांच्या तर्फे करण्यात आले आहे.....                                                                        

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या