🌟15 ऑगस्ट रोजी स्वांतत्र्य दिनानिमित्त करण्यात येणाऱ्या ध्वजारोहनाची संहिता काय आहे ते जाणून घेऊ या....!


🌟आता नवीन नियमांमुळे कोणतीही व्यक्ती मर्यादित स्वरूपात केव्हाही तिरंगा फडकवू शकते🌟

✍️ मोहन चौकेकर 

 ज्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला जाईल, ती जागा योग्य असावी. तिरंगा सर्वांना दिसेल अशा ठिकाणी फडकवावा.कोणताही ध्वज तिरंग्याच्या शेजारी लावायचा असेल, तर त्याची जागा तिरंग्याच्या खाली असावी तिरंगा फडकवण्याच्या वेळेस बिगुलाचा वापर करावा.तिरंगा कोणत्याही कारणामुळे कापला किंवा फाटला तर तो नियमानुसार नष्ट करावा.

एखाद्या मंचावर ध्वजारोहण होत असेल, तर वक्त्याने समोर पाहावे आणि तिरंगा ध्वज उजवीकडे असावा तिरंगा ध्वजाचा आकार आयताकृती असावा आणि त्याची लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3:2 असे असावे. तसेच ध्वजावरील अशोक चक्रामध्ये 24 आरे असणे आवश्यक आहे.

तिरंग्याचा कोणत्याही प्रकारे जमिनीला स्पर्श होऊ देऊ नये 2002 मध्ये भारतीय ध्वज संहिता लागू होण्यापूर्वी, 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट रोजी सामान्य लोक तिरंगा फडकवत होते पण आता नवीन नियमांमुळे कोणतीही व्यक्ती मर्यादित स्वरूपात केव्हाही तिरंगा फडकवू शकते.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या