🌟पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत आज 11 ऑगस्ट रोजी निदर्शन आंदोलने...!


🌟जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहाहण्याचे आवाहन अ.भा.मराठी पत्रकार संघा कडून करण्यात आले🌟


पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आ.किशोर पाटील यांच्या गुंडांनी  केल्याच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आ. किशोर पाटील व त्यांच्या समर्थकांवर कठोरातील कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न हिंगोली  जिल्हा मराठी पत्रकार संघ,  पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती हिंगोली आणि डिजिटल मीडिया परिषद हिंगोली च्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 01-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असून मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या निदर्शने आंदोलनात हिंगोली शहर व जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघ पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती कडून करण्यात आले आहे.....

       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या