🌟पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रिय कारभार पुन्हा एकदा उघड : यालाच म्हणता कावळा केला कारभारी अन्......!


🌟महाराष्ट्रीय कलावंत थोर गोंधळ सम्राट राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहाचा वापर चक्क मोकाट जनावर कोंडण्यासाठी🌟


🌟जुन्या कोंडवाडा अतिक्रमण धारकांच्या घश्यात घालण्याचा गंभीर प्रकार ?🌟 


पुर्णा (दि.१७ जुलै २०२३) - पुर्णा नगर परिषद प्रशासनातील अधिकारी/कर्मचाऱ्यांचे अकार्यक्षम व गलथान कारभाराचे अनेक किस्से उघड होत असतांना देखील या कारभारा विरोधात कारवाई करण्याऐवजी त्यावर पांघरुणच घालण्याचे दृष्कृत्य करीत असल्यामुळे या भ्रष्ट व अकार्यक्षम अधिकारी/कर्मचाऱ्यांची हिंमत कमालीची वाढल्याचे दिसत असून असाच एक गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला असून शहरात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ माजवणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्या संदर्भात प्रसिध्दी माध्यमांनी आवाज उठवून बातम्या प्रकाशित केल्यानंतर तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी माधवराव बोथीकर यांनी पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी लेखी स्वरुपात आदेश पारित केल्यानंतर खडखडून जागे झालेल्या नगर परिषद प्रशासनाने थातूरमातूर कारवाई करीत काही जनावर पकडली खरी परंतु त्या जनावरांची रवानगी नगर परिषदेच्या अधिकृत कोंडवाड्यात नकरता चक्क कोट्यावधी रुपयांच्या निधीतून जुना मोंढा परिसरात अंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त थोर गोंधळ सम्राट ज्यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी पॅरिसला जावून गोंधळ सादर केला ते महाराष्ट्र राज्याचे लोककलावंत गोंधळ सम्राट राजाराम बापू कदम (गोंधळी) यांच्या नावाने उभारलेल्या गोंधळ सम्राट कै.राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहालाच कोंडवाड्यात रुपांतरीत करून त्यात गाई वळू गाढव आदी मोकाट जनावर कुठल्याही चारा-पाण्याची व्यवस्था नकरता कोंडून अक्कलेचे तारे तोडल्यामुळे नागरिकांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे.   


  
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पौळ व नगर परिषद प्रशासनात कार्यरत अन्य अधिकारी/कर्मचारी सातत्याने नियमबाह्य व अनधिकृत कृत्यांना खतपाणी घालण्याचे कार्य करीत आपल्या कर्तव्याशी बेईमानी करीत सर्वसामान्य जनतेला वेठीस धरीत आपल्या पदाचा गैरवापर करीत भ्रष्ट व अनागोंदी कारभाराला खतपाणी घालण्याचेच कृत्य करीत आहेत त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव तक्रारींचा मार्ग पत्करावा लागत आहे परंतु तक्रारी केल्यानंतर देखील त्या तक्रारींचे समाधान करण्याऐवजी तक्रारदारांना धमकावल्या जात असल्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे दिसत असून नागरिकांच्या संतापाचा केव्हा उद्रेक होईल हे सांगता येत नाही.     


   पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या अकार्यक्षम निष्क्रिय कारभाराचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे शहरातील प्रमुख रस्त्यांसह मुख्य बाजारपेठ तसेच जुन्या मोंढ्यातील दररोज तसेच आठवड्यातून एकदा भरणाऱ्या भाजीपाला-फळ बाजारात देखील फिरणारे जनावरांचे कळप या जनावरांच्या कळपांमुळे नागरिकांसह व्यापारी देखील अक्षरशः त्रस्त झाल्यामुळे या संदर्भात प्रसार माध्यमांनी बातम्या प्रकाशित करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सातत्याने केला यावर तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री.बोथीकर यांनी नगर परिषद प्रशासनाच्या नावे आदेश देखील जारी केले.

परंतु नगर परिषद मुख्याधिकारी पौळ व नगर परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मैकाट फिरत असलेल्या गाई वासरांना पकडून नगर परिषदेच्या हक्काच्या कोंडवाड्यात न ठेवता चक्क गोंधळ सम्राट कै.राजाराम बापू कदम (गोंधळी) सांस्कृतिक सभागृहामध्ये डांबून त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना उपाशी तापाशी दोन/तिन दिवस ठेवल्याने या मुक्या जनावरांचे काही बरेवाईट झाल्यास जवाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण होतोय आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे देश विदेशात नावलौकिक करणाऱ्या या थोर कलावंताच्या नावाने कोट्यावधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले  सांस्कृतिक सभागृह माणसांसाठी की जनावरांसाठी ? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच म्हणावे लागेल त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या या अनागोंदी व गैरकारभारावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे....... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या