🌟पुर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न......!

          


🌟या कार्यक्रमाला श्री गुरु बुद्धीस्वामी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक डॉ. दत्तात्रय वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती🌟 


पुर्णा (दि.०१ जुलै २०२३) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक अंतर्गत श्री गुरु बुद्धिस्वमी महाविद्यालय, पूर्णा केंद्र क्रमांक 87126 तर्फे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 34 व्या  वर्धापन दिनाच्या निमित्ताने 1 जुलै रोजी महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

या कार्यक्रमाला श्री गुरु बुद्धीस्वामी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक डॉ. दत्तात्रय वाघमारे, श्री. उत्तमरावजी कदम, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. प्रमोद एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव श्री गोविंद कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. के. राजकुमार यांचे मार्गदर्शन लाभले,  तसेच उपप्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर व डॉ. शिवसांब कापसे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संजय दळवी, श्रीमती शेख फातेमा, डॉ. रवी बरडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पुष्पलता गंगासागर, डॉ. अजय कुऱ्हे, डॉ. आर. आर. राख, डॉ. विजय पवार,  प्रा. बालाजी शिंदे, प्रा. नामदेव पंडित, प्रा. नारायण ढोणे, प्रा. रोहित येरगुंटला कार्यालयीन अध्यक्ष श्री बाळासाहेब कुलकर्णी, गिरीश शिवणकर तसेच विद्यार्थ्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख डॉ. दिशा मोरे, संमत्रक डॉ. प्रकाश भांगे, संमत्रक डॉ. स्मिता जमधाडे गजानन भालेराव यांनी परिश्रम घेतले तसेच कालिदास वैद्य, भगुसिंग ठाकूर आणि विद्यार्थ्यांमध्ये महेश दवणे, विठ्ठल डहाळे यांनी सहकार्य केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या