🌟पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा धृतराष्ट्री कारभार : मुख्य मार्गांवरील खड्ड्यांसह नागरी असुविधांकडे दुर्लक्ष...!


🌟मुख्य मार्गांवरील खड्डे ठरताय अपघातांना कारणीभूत : मुख्याधिकारी पौळ यांच्याकडून तक्रारींना केराची टोपली ?🌟


पुर्णा (दि.२३ जुलै २०२३) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडे नागरी असुविधांसंदर्भात दाद मागण्यासाठी लेखी स्वरुपात तक्रारी दाखल करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः वेड्यात काढून त्यांच्या तक्रार अर्जांना सोईस्कररित्या केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्यासह नगर परिषद प्रशासनाकडून होत असल्यामुळे नागरिकांनी शेवटी दाद तरी मागायची कोणाकडे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या अकार्यक्षम धृतराष्ट्र प्रवृत्ती कारभारामुळे संपूर्ण शहरातील विविध प्रभागांसह मुख्य बाजारपेठेतही नागरी असुविधांनी तोंडवर काढले असतांना मात्र नगर परिषदेतील अधिकारी/कर्मचारी नागरी असुविधांवर योग्य तोडगा काढण्याऐवजी शहरातील विविध प्रभागांमध्ये होत असलेल्या बोगस व निकृष्ट कामांची बिल कश्या पध्दतीने सोईस्कररित्या भ्रष्ट गुत्तेदारांना करता येतील यावरच तर्कवितर्क करतांना पाहावयास मिळत आहे.


पुर्णा शहरातील लोकमान्य टिळक रोड,पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील मुख्य रस्त्यावर तसेच छत्रपती संभाजी महाराज चौकातील मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांसह पादचाऱ्यांच्या जिवीतास देखील धोका निर्माण झाल्याने या खड्ड्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा यासाठी परिसरातील नागरिकांनी दिलेल्या तक्रारींची देखील मुख्याधिकारी पौळ यांच्यासह नगर परिषद प्रशासन दखल घेत नसून नागरिकांनी दिलेल्या तक्रारींचे निवारण करण्याऐवजी त्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जात असल्याचे बोलले जात आहे लोकमान्य टिळक रोड परिसरातील मुख्य रस्त्यावर झालेल्या जिवघेण्या खड्ड्या संदर्भातील अशीच एक तक्रार दि.०७ जुलै २०२३ रोजी परिसरातील व्यापारी किशोर खराटे,शिवराज लाईतबार,गोविंद कदम,गोविंद चौधरी,राम भिसे यांनी दिली होती परंतु पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील मुख्याधिकारी पौळ यांनी या तक्रारीची दखल घेतली नसल्यामुळे एखादा मोठा अपघात होऊन एखाद्याचे बरेवाईट झाल्यास यास मुख्याधिकारी पौळ यांच्यासह नगर परिषद प्रशासनच जवाबदार राहिल असे तक्रारदार युवकांनी म्हटले आहे.


पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर पुर्णा नगर परिषदेतील प्रशासकीय कारभारासह शहरातील नागरी समस्यांवर देखील तोडगा निघून शहरातील अस्वच्छता,अस्वच्छ पाणीपुरवठा,शहरातील विविध भागांमध्ये उघड्यावर होणारी अवैध मांस विक्रीसह जनावरांच्या होणाऱ्या  बेकायदेशीर कत्तली,शहरात सर्वत्र फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या झुंडी,पंतप्रधान आवास योजना/रमाई घरकूल योजना आदी योजनांतील लाभार्थ्यांना वेळेवर न मिळणारे अनुदान आदी नागरी असुविधांवर तात्काळ कायम तोडगा काढण्याकडे मुख्याधिकारी पौळ लक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु मुख्याधिकारी पौळ हे सर्वार्थाने अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे....  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या