🌟मुंबईतील उल्हासनगर परिसरात भाजपाचे पदाधिकारी नरेश रोहडा यांच्यावर कार्यालयाजवळ गोळीबार...!


🌟गोळीबारामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण : घटना सिसीटीव्हीत कैद🌟

मुंबई (दि.१० जुलै २०२३) : मुंबईतील उल्हासनगर परिसरात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नरेश रोहडा यांच्यावर त्यांचे कार्यालया जवळ अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना काल रविवार दि.०९ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले यावेळी भाजप पदाधिकारी रोहडा यांच्या अंगरक्षकांनेही प्रत्यूत्तरादाखल गोळीबार केला. दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, गळीबाराचा हा प्रकार सीसीटीव्ही कैमेरात कैद झाला आहे.

उल्हासनगरमर्धील कम्प नंबर ५ च्या प्रभाराम मंदिराजवळ भाजप पदाधिकारी नरेश रोहरा यांचे कार्यालय अहे. येथे रविवारी सांयकाळी चार तरुण आले, त्यांनी रोहडा यांच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तेथील सुरक्षारक्षक आणि रोहड़ा याच्या अंगरक्षकांनी रोखले, त्यांची झड़ती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे हत्यारे असल्याचे आढळून आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या