🌟माझी पुर्णा संघर्ष प्रतिष्ठानने दिला आंदोलनाचा इशारा : ८ दिवसात परिसरातील नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी🌟
पुर्णा (दि.२४ जुलै २०२३) - पुर्णा नदीपात्रातील ज्या परिसरालगत पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल आहे त्या परिसरातील जनताच शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी वंचित राहावी या पेक्षा मोठे दुर्दैव कोणते ? असा प्रश्न उपस्थित होत असून पुर्णा नगर परिषदेचा अकार्यक्षम व नालायक कारभाराचे हे सर्वात उदाहरणच म्हणावे लागेल या भागातील परिस्थिती बघितल्यास 'दिव्या खाली अंधार' उक्तीचा प्रत्यय येणार नाही तरच नवल ? पूर्णा शहरातील प्रभाग क्रमांक ०६ व ०५ या प्रभागात असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर,कुंभार गल्ली,नाका परिसर आहीरे गल्ली हा सर्व परिसर पुर्णा नदी व थुना नदी लगचा मागासवर्गीय परिसर असून या परिसरात अद्यापही शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही या परिसरातील सर्वसामान्य जनता शुध्द पिण्याच्या नळाच्या पाण्यासाठी मागील अनेक वर्षापासून तरसत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौळ यांची आज सोमवार दि.२४ जुलै २०२३ रोजी माझी पुर्णा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा नेते राजु नारायनकर यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना लेखी स्वरुपात निवेदन देऊन प्रभाग क्रमांक ०६ व ०५ या प्रभागात असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर,कुंभार गल्ली,नाका परिसर आहीरे गल्ली तसेच अशोक नगर,भिम नगर,बागवान गल्ली,खुरेशी गल्ली,डोबी गल्ली,विणकर वाडा,नवीन आबादी,कोळी गल्ली,साई मंदिर परिसर,कोमटवार गिरणी परिसरात नवीन बोर टाकून पिण्याच्या पाण्याची सुविधा आठ दिवसात उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पुर्णा नदी/थुना नदी काठावरील उपरोक्त परिसरांतील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून शुध्द पिण्याचा पाणीपूरवठा होत नाही कारण पुर्वीची जी जुनी पाईप लाईन आहे ती सडून गेल्यामुळे बंद पडून त्यातून एखादे वेळेस पाणी आले तरी अत्यंत दुषीत पाणी येते व तेही पाणी खूप कमी प्रमाणात येते सध्याला पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या परिसरात जनतेला पिण्याच्या पाणी उपलब्ध नाही दुषीत पाणी पिल्यास त्यां परिसरातील लोकांना अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो याचा नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा तसेच अण्णाभाऊ साठे नगर,भिम नगर,बागवान गल्ली,नाका परिसर,कुंभार गल्ली,अशोक नगर,कोळी गल्ली व मठवार गल्ली,साई मंदिर या सर्व परिसरात अनेक बोर कायमचे अनेक वर्षांपासून बंद पडले आहेत वरील वेगवेगळ्या परिसरात नवीन बोर आठ दिवसाच्या आत टाकण्यात याव्यात तसेच अण्णाभाऊ साठे नगर कुंभार गल्ली अहिरे गल्ली नाका परिसर या सर्व परिसरात महादेव मंदिर शिवाजी रोड किंवा टिळक रोड या ठिकाणाहून गेलेल्या मोठ्या पाईपलाईन मधून नळाची नवीन पाईपलाईन टाकून आठ दिवसात वरील परिसरात जनतेला पाणी उपलब्ध करून देण्यात यावं वरील परिसर परिसरातील जनतेची पिण्याच्या शुध्द पाण्या करिता होणारी हेडसाळ कायमची थांबवावी अशी मागणी नगरपालिका प्रशासनास माझी पूर्णा संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
माझी पुर्णा संघर्ष प्रतिष्ठानच्या या गागणीचा नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने विचार न घेतल्यास आपल्या कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला यावेळी शिस्टमंडळात संस्थापक अध्यक्ष राजू नारायणकर,विनोद गायकवाड,सुधाकर गायकवाड महानंद एंगडे,प्रकाश गायकवाड,रवी गायकवाड,राम जोनवाल,दिपक भालेराव,टेकाजी गायकवाड,शामराव खंदारे,दिपक बुरुड,सचिन गायकवाड,सदानंद भंगे अस्लम भाई मनोज भिसे विशाल कांबळे व बालाजी आदींची उपस्थिती होती........
0 टिप्पण्या