🌟पुर्णा तालुक्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहिर प्रवेश...!


🌟जिल्हा प्रमुख माधवरावजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश🌟पुर्णा (दि.१२ जुलै २०२३) - पुर्णा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही गळती लागल्याचे निदर्शनास येत असून आज बुधवार दि.१२ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी परभणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख माधवरावजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला.

सदरील शिवसेना पक्ष प्रवेश सोहळा येथील शिवसेना कार्यालयात संपन्न झाला यावेळी गोपाळ बोबडे,संतोष खंदारे,मारोती खंदारे,रामचंद्र नवले,मुरलीधर पवार,प्रणव कुठे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी उपजिल्हा प्रमुख एकनाथराव लोखंडे,पुर्णा तालुका प्रमुख प्रकाशराव कऱ्हाळे शहर प्रमुख विशाल किरडे,पुर्णेचे युवा शहर प्रमुख अंकित कदम,शहर संघटक विशाल कदम उपशहर प्रमुख लक्ष्मण कदम सतीश कदम अविनाश रेंगे आदी शिवसैनिक उपस्थित होते...  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या