🌟यावेळी शेतकरी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते🌟
पुर्णा (दि.०२ जुलै २०२३) - पुर्णा तालुक्यातील मौजे दस्तापुर येथे मा. प्रकल्प संचालक आत्मा परभणी श्री दौलत चव्हाण सर प्रकल्प उपसंचालक आत्मा परभणी श्री बनसावडे सर तालुका कृषी अधिकारी श्री नित्यानंद काळे सर यांचे मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी सप्ताह कृषी दिन आज दिनांक एक जुलै 2023 रोजी संपन्न झाला.
यावेळी शेतकरी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी गजानन चाळक यांची प्रमुख उपस्थिती होती तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री विलास जोशी यांनी शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्रज्ञान वापरूनच करावी याविषयी मार्गदर्शन केले तसेच तुकाराम मोरे व गजानन चाळक यांचे शेतावर बीबीएफ द्वारा पेरणी चे प्रात्यक्षिक घेण्यात आले शंखी गोगलगाय नियंत्रण याविषयी मार्गदर्शन करून ॲग्रोवनचे खरीप विशेषांक वाटप शेतकऱ्यांना केले कृषी सहाय्यक श्रीमती सुलोचना मात्रे यांनी सोयाबीन उगवण क्षमता व बीज प्रक्रिया याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त कृषी दिनास दस्तापुर येथील बालाजी सोळंके मोरे यांचे सह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या