🌟श्री वैद्यनाथ आयटीआय हाळम विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी ठरणार टर्निंग पॉईंट - माधव मुंडे


🌟महाविद्यालयाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यात कोणत्याही कॉलेजमध्ये नसलेले दोन अभ्यासक्रम या कॉलेजमध्ये🌟


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- तालुक्यातील हाळम येथे दयाधर्म सामाजिक प्रतिष्ठान संचालित श्री वैद्यनाथ आयटीआय विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम घेऊन आले आहे. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष माधव मुंडे यांनी सांगितले.


         महाविद्यालयाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यात कोणत्याही कॉलेजमध्ये नसलेले दोन अभ्यासक्रम या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. श्री वैद्यनाथ आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करता येणार आहे. यामध्ये सोलार टेक्निशियन आणि हेल्थ सॅनिटरी (आरोग्य निरीक्षक)हे दोन ट्रेड याठिकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय इलेक्ट्रिशन (विजतंत्री),वायरमन (तारतंत्री) आदी कोर्सेस पूर्ण करता येतील.

         राज्याचे मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा जिल्हा सरचिटणीस माधव मुंडे यांनी ग्रामीण भागातील तरुणांना नोकरी व रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने आयटीआय ग्रामीण भागात उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरसाठी नव संजीवनी दिली आहे. प्रवेशासाठी काही दिवस शिल्लक असून, विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश निश्चित करावा असे व्यवस्थापनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

   सध्या मोठ्या प्रमाणात  महावितरणमध्ये भरती निघणार असून इलेक्ट्रिशियन व वायरमन या कोर्सेस ना मोठ्या प्रमाणात संधी राहणार आहे त्याचप्रमाणे सोलर व हेल्थ सॅनिटरी या ट्रेडसाठी सर्व क्षेत्रात मोठ्या संधी आहेत 100% शासकीय नौकरी मिळेल. श्री वैद्यनाथ आयटीआयची वैशिष्ट्ये म्हनजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व भविष्यकालीन करिअरसाठी दर्जेदार असून यंत्रसामुग्रीसह सुसज्ज व आधुनिक वर्कशॉप, उत्कृष्ट निकाल संस्था देत असून अप्रेंटिस ची हमी संस्थेमार्फत मिळणार आहे तसेच प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकवर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच संस्थेची सुसज्ज अशी भव्य इमारत व ग्रंथालय इंटरनेटचे सुविधा तसेच शैक्षणिक वर्षांमध्ये औद्योगिक सहलीचे आयोजन आदी विद्यार्थ्यांना मिळणार असून, 100% जॉब प्लेसमेंट संस्थेकडून दिली जाणार आहे.

   श्री वैद्यनाथ आयटीआय डीजीइटी(DGET) नवी दिल्ली मान्यता प्राप्त आयटीआय कॉलेज आहे. फॉर्म भरलेले विद्यार्थी कॉलेजमध्ये येऊन कागदपत्रे पडताळणी करून घेऊ शकतात. तरी मौजे हळम येथील श्री वैद्यनाथ आयटीआय ला आपला प्रवेश आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी ९६०७५१२१११,९१४६०७२१११, ८७६७९७१२१५ क्रमांकावर संपर्क करावा.

.....................................................................................

सोलार टेक्निशियन व हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर हे नवीन ट्रेड श्री वैद्यनाथ आयटीआय कॉलेजची जमेची बाजू

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या